सेवापूर्ती नंतर कुटुंबासाठी वेळ द्यावा: अनिस नायकवडी
कराड -शिक्षकांनी सेवापुर्तीनंतर उर्वरित कालावधी आपल्या कुटुंबासोबत खर्च करावा आणि कौटुंबिक कार्यासाठी वेळ द्यावा असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी केले
सदाशिवगड ता कराड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक जी.बी.देशमाने यांच्या
सेवापूर्ती सत्कार समारंभामध्ये बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव डी ए पाटील हे होते यावेळी माजी शिक्षण विस्तार अधिकारी शकुंतला पाटील,संस्था संचालक प्रा.रमेश डुबल, राजेंद्र काटवटे, केंद्र प्रमुख मधुसूदन सोनवणे, मुख्याध्यापक के आर साठे,व्ही.एच कदम,ए. आर.मोरे,डी. पी. पवार, उपसरपंच शरद कदम,चारूशिला तारू, हणमंत कदम, डॉ.राजेद्र घारे यांचीप्रमुख उपस्थिती होती.
नायकवडी म्हणाले शिक्षकांना सेवा बजावत असताना आपल्या कुटुंबासाठी वेळ देताना खूप अडचण येतात. त्यामुळे सेवापुर्तीनंतर आपली आवड, छंद आवडीनिवडी जोपासण्यासाठी आणि कौटुंबिक प्रगतीसाठी शिक्षकांनी वेळ द्यावा.
संस्था सचिव डी ए पाटील म्हणाले स्वर्गीय ए व्ही पाटील यांनी यशवंत शिक्षण संस्था सुरू केली नंतर पहिले शिक्षक म्हणून जी.बी.देशमाने यांची नियुक्ती केली.
गेली ३५वर्षे त्यांनी आपले काम प्रामाणिकपणे केले आहे.सेवा पुर्ती नंतर ही त्यांनी संस्थेसाठी वेळ द्यावा.त्यांच्या अनुभवाची शिदोरीचा संस्थेला निश्चित फायदा होईल. तर यशवंत शिक्षण संस्थेचे शाखांचा आज वटवृक्ष झाला आहे.
यावेळी प्रा.रमेश डुबल, शिक्षक सदाशिव मुळीक,मनिषा पानवळ, श्वेता देशमाने,एस डी चव्हाण,विजया कदम,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सेवानिवृत्ती मुख्याध्यापक जी.बी.देशमाने म्हणाले स्वर्गीय ए व्ही पाटील अण्णा यांनी मला या संस्थेत सेवा करण्याची संधी दिली.त्यांच्या कडून च मी शिक्षण क्षेत्रातील बाळ कडू शिकलो, विद्यार्थी हेच आपले दैवत मानून काम केले.गेली ३५वर्षे यशवंत शिक्षण संस्थेच्या दोन शाखा मधुन काम केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक एस डी वेताळ, स्वागत गजानन देशमाने, सुत्रसंचलन राजू अपिने व मनिषा पानवळ यांनी व आभार अनिल जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास यशवंत शिक्षण संस्थेचे पाच ही शाखेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.