Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला- उद्धव ठाकरे

आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला- उद्धव ठाकरे

आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला- उद्धव ठाकरे 

मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला. वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी भाषेसाठी एकाच मंचावर एकत्र आले. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. “आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला” असं म्हणत निशाणा साधला आहे.

भाजपा ही अफवांची फॅक्ट्री आहे. हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा जास्त कडवट, कट्टर, देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय. ९२-९३ मध्ये जे काही घडलं तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांनाही हिंदू म्हणून शिवसैनिकांनी मराठी माणसानं वाचवलं. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं आहे

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Post Views: 248 महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५

Live Cricket