Home » ठळक बातम्या » राशींभविष्य » आजचे राशिभविष्य दिनांक (9 एप्रिल 2025)राशींभविष्य

आजचे राशिभविष्य दिनांक (9 एप्रिल 2025)राशींभविष्य

आजचे राशिभविष्य दिनांक (9 एप्रिल 2025)राशींभविष्य

शके १९४७, विश्वावसुनाम संवत्सर, चैत्र शुक्ल दशमी, सोमवार, दि. ७ एप्रिल २०२५, चंद्र – कर्क राशीत, नक्षत्र – आश्लेषा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. २९ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ५३ मि.                                       

          मेष : आज आपले मनोबल अपूर्व असणार आहे. व्यवसायत सुयश लाभेल. नोकरीत स्वास्थ्य लाभणार आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपल्याला मानसन्मान लाभणार आहे.

वृषभ : नातेवाईकांच्या सहकार्याने आज आपण एखादी समस्या सोडवू शकाल. काहींना गुरुकृपा लाभेल. व्यवसायानिमित्त अनपेक्षित प्रवास करावा लागणार आहे. चिकाटी वाढणार आहे.  

मिथुन : मनोबल उत्तम राहील. आजचे आपले आर्थिक नियोजन अचूक ठरणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. प्रवासात आनंददायी घटना घडेल. कौटुंबिक सौख्य लाभणार आहे. 

कर्क : आज आपला उत्साह विशेष असणार आहे. गरजूंना मदत कराल. आपल्या नोकरीत आपला प्रभाव वाढणार आहे. तुमच्या कामाची उचित दखल घेतली जाईल. आत्मविश्वास वाढणार आहे. 

सिंह : मनोबल कमी असल्याने अस्वस्थता राहील. आज आपल्या हातून एखादी चूक होण्याची शक्यता आहे. आपण काळजी व दक्षता घ्यावी. आपले महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. 

कन्या : काहींना विविध लाभ होतील. जुन्या आठवणींत रमणार आहात. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. आज तुमचे आर्थिक अंदाज अचूक ठरणार आहेत. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत.

तुला : दैनंदिन जीवनात आनंददायी घटना घडेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार आहे. आपल्या महत्त्वाच्या कामात आज आपल्याला सुयश लाभणार आहे. तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे.

वृश्चिक : तुम्हाला उचित मार्गदर्शन लाभेल. कामाचा ताण कमी होईल. नवा मार्ग दिसेल. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे. महत्त्वाच्या कामात नातेवाईकांचे सहकार्य लाभणार आहे. प्रवास होतील. 

धनु : मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. कामामध्ये चूक होण्याची शक्यता आहे. आज आपण कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करु नये. काहींना आरोग्याच्या तक्रारी सतावणार आहेत.

मकर : मनोबल व आत्मविश्वास वाढवणारी एखादी घटना घडेल. प्रवासात लाभ होणार आहेत. आज तुम्ही आपले विचार स्पष्टपणे मांडणार आहात. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे.  

कुंभ : प्रवास शक्यतो आज नकोत. अचानक उदभवणारे खर्च मानसिक अस्वस्थता देतील. काहींना नैराश्य जाणवणार आहे. आज आपण कोणावरही अवलंबून राहू नये. वाहने जपून चालवावित.

मीन : दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे पार पडणार आहेत. तुमचे आर्थिक अंदाज अचूक ठरणार आहेत. प्रवासाचे योग येतील. आज तुम्ही प्रियजनांकरिता वेळ देऊ शकणार आहात. प्रवासात फायदा होईल

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Post Views: 248 महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५

Live Cricket