Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ज्ञानाची गुढी उभारून व पाठ्यपुस्तकांचे वितरण करून प्रवेशोत्सव साजरा

श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ज्ञानाची गुढी उभारून व पाठ्यपुस्तकांचे वितरण करून प्रवेशोत्सव साजरा

श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ज्ञानाची गुढी उभारून व पाठ्यपुस्तकांचे वितरण करून प्रवेशोत्सव साजरा

सातारा : दिनांक 16 जून करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या मध्ये मोठा उत्साह दिसून आला. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागतही झांज पथकाच्या तालावर टाळ्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात करण्यात आले. ज्ञानाची गुढी उभारल्यामुळे एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते.

शिक्षण प्रसारक संस्थेचे विद्यमान सचिव श्री तुषार पाटील यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या व मोलाचे मार्गदर्शन ही केले . चालू शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यालयामध्ये अनेक नवनवीन उपक्रम सुरू करण्याचे सुतोवाचही त्यांनी यावेळी केले त्यानंतर त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अमरसिंह वसावे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी व शिक्षकांच्या मध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पाचगणी येतील शॉपिंग सेंटर परिसरातील सुलभ शौचालयाच्या कामाचे भूमिपूजन

पाचगणी येतील शॉपिंग सेंटर परिसरातील सुलभ शौचालयाच्या कामाचे भूमिपूजन पाचगणी शहर विकास आघाडीची वचनपूर्ती; नागरिकांची अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी

Live Cricket