नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात

सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात

सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात

सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी माजी मंत्री व चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या विरोधातील महायुती आणि काँग्रेस आघाडीत बिघाडी झाली. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून एकमत न झाल्याने कारखान्यासाठी तिरंगी सामना पाहायला मिळणार आहे. 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

सह्याद्रि कारखान्यासाठी 214 उमेदवारी अर्ज पात्र ठरले होते. अर्ज माघारीसाठी शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. अर्ज मागे घेण्यासाठी सकाळपासूनच सत्ताधारी, विरोधी गटातील अनेक जण येत होते. मात्र, विरोधी गटात मेळ न बसल्याने त्याच्यात फूट पडल्याचे दिसून आले. सह्याद्रि कारखाना निवडणुकीसाठी 214 पैकी 144 उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले. त्यामुळे 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांनी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली.

विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनेल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे उत्तर तालुका अध्यक्ष निवासराव थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांचे दुसरे पॅनेल, तर कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील रयत संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना यांचे तिसरे पॅनेल अशा तिरंगी लढतीचे संकेत मिळाले आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket