थायलंड मधील गणेश मंदिरात घुमताहेत पाचवडच्या सनई चौघड्याचे मंगल स्वर
भुईंज [महेंद्रआबा जाधवराव ]पाचवड ता.वाई येथील स्वर सुगंध शहनाई ग्रुपचे अभिजीत दिलीप जाधव यांची थायलंड मधील फुकेट लॉर्ड श्रीमंत गणपती बाप्पा देवालयात गणेश जयंती ते महाशिवरात्री पर्यंत दररोज सकाळी दुपारी आणि सायंकाळी सनई चौघडा वादन सेवा सुरु आहे.या मंगलमय सेवेबाबत माहिती देताना अभिजीत जाधव म्हणाले,थायलंड मधील फुकेट येथे लॉर्ड श्रीमंत गणपती बाप्पाचे भव्य मंदिर बांधन्यात आले आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची प्रतिकृती बनवली आहे. माझे गुरुजी पंडित डॉ.प्रमोदजी प्रभाशंकर गायकवाड पुणे यांच्या कृपेने मला या ठिकाणी सेवा करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली. दिनांक 1 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी दुपारी आणि सायंकाळी सनई चौघडा वादन सेवा सुरू आहे.
अभिजित जाधव यांचे आजोबा कै.सिताराम बापू जाधव हे प्रसिद्ध सनई वादक होते. त्यांची परंपरा पाचवड ता. वाई येथील सर्व जाधव परिवार सांभाळत आहे. परदेशात प्रथमच धार्मिक ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल कला दैवतचा अत्यंत ऋणी असल्याची भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
