Home » देश » टेबल लँड व्यापारी असोसिएशनतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार

टेबल लँड व्यापारी असोसिएशनतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार

टेबल लँड व्यापारी असोसिएशनतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार

पाचगणी प्रतिनिधी –टेबल लँड व्यापारी असोसिएशन पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद पाचगणी निवडणूक 2025 मध्ये विजयी झालेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ सोमवारी (दि. 5 जानेवारी 2026) टेबललँड, पाचगणी येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री. राजेंद्र शेठ राजपुरे यांनी भूषविले.

सत्कारप्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्यासह नगरसेवक शेखर कासुर्डे, नरेंद्र बिरामने, आकाश बगाडे, विमल भिलारे, अमित कांबळे, राजश्री सणस, परवीन मेमन, महेश खांडके, प्रकाश गोळे, राजेंद्र पारठे, स्वाती कांबळे, अमृता गोळे, शिल्पा माने, माधुरी कासुर्डे व सुप्रिया माने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी टेबल लँड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सुधाकर बगाडे, उपाध्यक्ष श्री. नामदेव चोपडे, सचिव श्री. दिलीप कांबळे व खजिनदार श्री. अनिल वन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.

तसेच संभाजी कांबळे, सचिन जानकर, राहुल बगाडे, रोहित बगाडे, वीरेंद्र मोरे, राहुल शिंदे, निलेश मोरे, राहुल सोंडनवर, विराज चव्हाण, सुजित सोंडनवर, मनोज जानकर, विवेक कांबळे व योगेश जानकर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पाचगणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या नगरपरिषदेने सकारात्मक व लोकाभिमुख कामकाज कार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. सत्कार सोहळ्यामुळे टेबललँड परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान 

कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  सातारा जिल्ह्यातील कोडोली गावचे प्रगतशील शेतकरी आणि पशुपालक

Live Cricket