नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांची वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील स्ट्रॉबेरी शेताला भेट

फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांची वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील स्ट्रॉबेरी शेताला भेट

फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांची वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील स्ट्रॉबेरी शेताला भेट

वाई प्रतिनिधी -राज्याचे फलोत्पादन, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री मा. ना. श्री.भरतशेठ गोगावले यांनी वाई तालुक्यातील ओझर्डे गावात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी श्री. महादेव कोळी व श्री. परशुराम बिराजदार यांच्या शेताला भेट देऊन प्रत्यक्ष स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी केली.या भेटीदरम्यान मंत्री गोगावले यांनी स्ट्रॉबेरी लागवड पद्धती, रोपवाटिका, उत्पादन क्षमता, बाजारपेठ, खर्च–उत्पन्नाचे गणित तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर माहिती घेतली. 

स्ट्रॉबेरीसारखी उच्च मूल्य पिके शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. फलोत्पादन विभागामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य शेतकऱ्यांना दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.ओझर्डे परिसरात स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी ठरत असल्याचे सांगत, आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन व सुधारित रोपांचा वापर करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांचे मंत्री गोगावले यांनी विशेष कौतुक केले.

महाबळेश्वरसह वाई, कोरेगाव व जावळी तालुक्यांचा परिसर स्ट्रॉबेरी व फलोत्पादनासाठी अत्यंत पोषक असून, स्ट्रॉबेरी, फळबागा तसेच प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी स्मार्ट, पी.एम. एफ.ई. योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रसंगी प्रगतीशील शेतकरी श्री. सागर फाटक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket