Home » ठळक बातम्या » नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत

नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत

नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवार दि. 22 रोजी साताऱ्यात आगमन होणार असून यानिमित्ताने त्यांचे भव्य जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

सातारा- पुणे महामार्गावर निरा नदी पुलाजवळ ना. शिवेंद्रसिंहराजे यांचे रविवारी सकाळी 10 वाजता आगमन होणार असून तेथून सताऱ्याच्या दिशेने भव्य रॅली निघणार आहे. महामार्गावर निरा नदी पूल ते शिरवळ, खंडाळा, भुईंज, पाचवड मार्गे कुडाळ, करहर ते मेढा, मेढ्यातून मोळाचा ओढा ते करंजे ते शिवतीर्थ पोवई नाका येथे दुपारी 4 वाजता शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. याठिकाणी सर्व सातारकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पोवई नाक्यावरून वाय. सी. कॉलेज मार्गे गोडोली, विलासपूर मार्गे अजिंक्यतारा कारखाना अशी रॅली जाणार असून त्याठिकाणी स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यात येणार आहे. शेंद्रे येथून बोगदा मार्गे समर्थ मंदिर, राजवाडा ते सुरुची बंगलो अशी रॅली होणार आहे. या रॅलीत निरा पूल येथे सर्व कार्यकर्त्यांनी आपली चारचाकी वाहने घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सर्व पदाधिकारी, सातारा- जावलीतील ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्रसमूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मौजे अतिट येथे एसीजी केअर्स फाउंडेशन आणि इनोरा नो हाऊ फाउंडेशन व अतिट ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानातून राबवला गेला एकात्मिक घनकचरा प्रकल्प

Post Views: 19 मौजे अतिट येथे एसीजी केअर्स फाउंडेशन आणि इनोरा नो हाऊ फाउंडेशन व अतिट ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानातून

Live Cricket