वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत अर्णवी वन्नेचा १९ वा वाढदिवस उत्साहात साजरा!
वाई : कामगार सुरक्षा दलाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. नितीन वन्ने यांची कन्या कु.अर्णवी नितीन वन्ने हिचा १९ वा वाढदिवस वाई तालुक्यातील आस्था वृद्धाश्रमात सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसाच्या निमित्ताने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना स्नेहपूर्वक भोजनाचे वाटप करण्यात आले. केवळ स्वतःचा आनंद साजरा न करता समाजातील ज्येष्ठ नागरिकांसोबत आनंदाचे क्षण वाटून घेण्याचा वन्ने कुटुंबाचा हा उपक्रम उपस्थितांसाठी कौतुकास्पद ठरला.
यावेळी समाजसेविका आशाताई वन्ने, श्री. पिंकेश सपकाळ, श्री. संजय वन्ने, श्री. नितीन वैराट तसेच आस्था वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.या उपक्रमातून सामाजिक जाणीव, माणुसकी आणि ज्येष्ठांप्रती असलेला आदर यांचा सुंदर संदेश देण्यात आला. अर्णवीच्या या वाढदिवसाचे उपस्थितांनी कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



