अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » मित्रपक्षांना डावलून सत्ता घेतली; आता विधान परिषदेत भाजपला धडा मिळणार?”

मित्रपक्षांना डावलून सत्ता घेतली; आता विधान परिषदेत भाजपला धडा मिळणार?”

सातारा जिल्हा परिषदेत मित्रपक्षांना डावलल्याची किंमत भाजपला मोजावी लागणार? विधान परिषदेत धैर्यशीलदादा कदम अडचणीत येणार?

सातारा(अली मुजावर )सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशीलदादा कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला, तरी भाजपच्या राजकीय डावपेचांचा फटका आता स्वतः भाजपलाच बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सातारा जिल्हा परिषदेत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांना बाजूला सारत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली. त्या निर्णयामुळे महायुतीतील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा आजही सुरू आहे.

विशेष म्हणजे, सातारा–सांगली विधान परिषद ही सर्वसामान्य जनतेची निवडणूक नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची निवडणूक आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे निवडून आलेले सदस्यच येथे मतदान करतात. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नाराजी, गटबाजी आणि राजकीय समीकरणे निकालावर थेट परिणाम करू शकतात.

सातारा आणि सांगली जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे मोठे संख्याबळ असल्याने भाजपसमोर सोपी लढत नसल्याचे बोलले जात आहे. मित्रपक्षांची नाराजी मतदानाच्या वेळी उफाळून आली, तर धैर्यशीलदादा कदम यांच्यासाठी ही निवडणूक अपेक्षेपेक्षा अधिक कठीण ठरू शकते.

आता प्रश्न एकच आहे — सातारा जिल्हा परिषदेत मित्रपक्षांचा “करेक्ट कार्यक्रम” करणाऱ्या भाजपला विधान परिषदेत मित्रपक्षच राजकीय धडा शिकवणार का? याचे उत्तर निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket