Home » राज्य » मित्रपक्षांना डावलून सत्ता घेतली; आता विधान परिषदेत भाजपला धडा मिळणार?”

मित्रपक्षांना डावलून सत्ता घेतली; आता विधान परिषदेत भाजपला धडा मिळणार?”

सातारा जिल्हा परिषदेत मित्रपक्षांना डावलल्याची किंमत भाजपला मोजावी लागणार? विधान परिषदेत धैर्यशीलदादा कदम अडचणीत येणार?

सातारा(अली मुजावर )सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशीलदादा कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला, तरी भाजपच्या राजकीय डावपेचांचा फटका आता स्वतः भाजपलाच बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सातारा जिल्हा परिषदेत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांना बाजूला सारत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली. त्या निर्णयामुळे महायुतीतील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा आजही सुरू आहे.

विशेष म्हणजे, सातारा–सांगली विधान परिषद ही सर्वसामान्य जनतेची निवडणूक नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची निवडणूक आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे निवडून आलेले सदस्यच येथे मतदान करतात. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नाराजी, गटबाजी आणि राजकीय समीकरणे निकालावर थेट परिणाम करू शकतात.

सातारा आणि सांगली जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे मोठे संख्याबळ असल्याने भाजपसमोर सोपी लढत नसल्याचे बोलले जात आहे. मित्रपक्षांची नाराजी मतदानाच्या वेळी उफाळून आली, तर धैर्यशीलदादा कदम यांच्यासाठी ही निवडणूक अपेक्षेपेक्षा अधिक कठीण ठरू शकते.

आता प्रश्न एकच आहे — सातारा जिल्हा परिषदेत मित्रपक्षांचा “करेक्ट कार्यक्रम” करणाऱ्या भाजपला विधान परिषदेत मित्रपक्षच राजकीय धडा शिकवणार का? याचे उत्तर निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराडच्या नव्या उड्डाणपुलावर भीषण अपघात कातरखटावच्या चार युवकांचा दुर्दैवी अंत

कराडच्या नव्या उड्डाणपुलावर भीषण अपघात कातरखटावच्या चार युवकांचा दुर्दैवी अंत कराड प्रतिनिधी – कराड शहराजवळ पुणे-बेंगलोर महामार्गावर मंगळवारी रात्री ११.

Live Cricket