नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » पर्यटन » निर्भीड पत्रकारितेचा सजग चेहरा : आदरणीय अविनाश कदम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

निर्भीड पत्रकारितेचा सजग चेहरा : आदरणीय अविनाश कदम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

निर्भीड पत्रकारितेचा सजग चेहरा : आदरणीय अविनाश कदम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

सातारा -खटाव तालुक्यात पत्रकारितेच्या माध्यमातून गेली तब्बल पंचवीस वर्षांहून अधिक काळ समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणारे, सामाजिक व राजकीय विषयांवर निर्भीडपणे लेखणी चालवणारे जेष्ठ पत्रकार आदरणीय अविनाश कदम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे.

दुष्काळी परिस्थितीशी झुंज देणाऱ्या खटाव तालुक्यात जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या लेखणीचा प्रभावी वापर केला. समाजातील सर्वसामान्य माणसांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून अनेक प्रश्नांची उकल करण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. त्यामुळेच खटाव तालुक्यात एक अभ्यासू, संयमी आणि जनतेच्या प्रश्नांशी बांधिलकी जपणारा पत्रकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक ‘पुढारी’चे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना त्यांनी पत्रकारितेची मूल्ये जपत सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्यांमधून समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने केले आहे. शांत स्वभाव, संयम, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि अभ्यासू वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विशेष वैशिष्ट्ये आहेत.

पत्रकारितेसोबतच शिक्षकाच्या भूमिकेतूनही त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडविले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वी करिअर घडवत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून योग्य दिशा देण्याचे कार्य त्यांनी निस्वार्थपणे केले आहे.

खटाव तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी आपल्या लेखणीतून सातत्याने आवाज उठवला. सामाजिक प्रश्न, विकासकामे, शैक्षणिक विषय तसेच जनहिताच्या मुद्द्यांवर त्यांनी केलेले लेखन आजही प्रेरणादायी मानले जाते. पत्रकारितेमध्ये त्यांना अनेक सामाजिक संस्थेचे पुरस्कार ही प्राप्त झाले आहेत.

अशा या समाजाभिमुख, निर्भीड आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्या हातून असेच समाजहिताचे कार्य अखंडपणे घडत राहो आणि आई तुळजाभवानी यांच्या कृपेने आपणास निरोगी, आनंदी व उदंड आयुष्य लाभो, हीच सदिच्छा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket