नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शेत शिवार » गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची व्याप्ती वाढवणार -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची व्याप्ती वाढवणार -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची व्याप्ती वाढवणार -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा -गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना शेतकऱ्यांसह धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांना खूप उपयोगी आहे. या योजनेची व्याप्ती राज्यात वाढवणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालय व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोयना धरणातील गाळ काढण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे याचा शुभारंभ दरे तालुका महाबळेश्वर येथे उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवन संरक्षक अमोल सातपुते, वाईचे प्रांताधिकारी डॉ, योगेश खरमाटे, सातारचे प्रांताधिकारी आशिष बारकुल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

उन्हाळ्यामध्ये धरणाची पाणी पातळी कमी होते. पाणी पातळी कमी झाल्यामुळे धरणातील गाळ काढल्यानंतर पाण्याची क्षमता ही वाढते व गाळाचा उपयोग शेतीमध्ये केला जातो. यामुळे शेती अधिक सुपीक व कृषी उत्पन्न जास्त देते. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसह धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी फार महत्त्वाची आहे. 

तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धरणांमधील व तलावांमधील गाळ काढून तो आपल्या शेतात टाकावा व आपली शेत जमीन जमीन सुपीक करून कृषी उत्पन्न वाढवावे असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket