नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » प्रशासकीय » जिल्ह्यात गॅस, पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध नागरिकांनी अनावश्यक साठा करु नये-पालकमंत्री शंभूराज देसाई

जिल्ह्यात गॅस, पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध नागरिकांनी अनावश्यक साठा करु नये-पालकमंत्री शंभूराज देसाई

जिल्ह्यात गॅस, पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध नागरिकांनी अनावश्यक साठा करु नये-पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा – जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ग्राहकांना मुदतीत गॅस मिळेल लोकांना पॅनिक होऊन गॅस एजन्सीसमोर नाहक रांगा लावू नयेत तसेच पेट्रोल डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध आहे. भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, व इंडियन ऑइल या कंपन्यांनी जिल्ह्यातील वितरकांना एक दिवसाचे क्रेडीट देऊन पुरवठा करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही टंचाई नाही, याबाबत लोकांनी आश्वस्त रहावे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील अशी ग्वाही पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

जिल्ह्यातील पेट्रोल, एलपीजी तसेच इतर अत्यावश्यक सेवांच्या पुरवठ्या संदभार्त पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, अपर जिल्हाधिकारी मल्लीकार्जून माने, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह पुरवठाधारक कंपन्यांचे प्रतिनिधी, सर्व प्रांताधिकारी उपस्थित होते. 

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, पेट्रोल, एलपीजी, गॅस या सर्वांचा साठा जिल्ह्यात पूरेसा असून रिफिलींगची व्यवस्थाही अंत्यंत चांगली आहे. त्यामुळे जिल्ह्यात या जीवनावश्यक वस्तुंची टंचाई नाही, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी यांच्यासमोर अकारण रांगा लावू नयेत. वाहनांमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त इंधन भरू नये. किंवा त्याचा घरात कॅनमध्ये साठा करुन आपला जीव धोक्यात घालू नये, सर्वत्र परिस्थीती नियंत्रणात आहे. साठा करण्याची गरज नाही.

सातारा जिल्ह्यात भारत पेट्रोलियम चे 99 हिंदुस्तान पेट्रोलियमचे 102 आणि इंडियन ऑइल चे 136 असे 337 पेट्रोल पंप आहेत. या तिन्ही कंपन्यांच्या मिळून 89 गॅस एजन्सी असून 9 लाख 64 हजार 552 गॅस ग्राहकांची संख्या आहे. साठेबाजी किंवा काळाबाजार होवू नये यासाठी तहसीलदार स्तरांवर भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल टंचाईचा गैरफायदा घेऊन साठेबाजी आणि काळाबाजार होवू नये यासाठी एक मार्च ते 25 मार्च या कालावधीमध्ये 640 ठिकाणी जिल्ह्यात धाडी घालण्यात आलेल्या आहेत.  

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket