नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » ठळक बातम्या » राज्यातील कंत्राटदारांची ७४ हजार कोटीची थकबाकी टप्याटप्याने देणार, अर्थसंकल्पात तरतूद

राज्यातील कंत्राटदारांची ७४ हजार कोटीची थकबाकी टप्याटप्याने देणार, अर्थसंकल्पात तरतूद 

राज्यातील कंत्राटदारांची ७४ हजार कोटीची थकबाकी टप्याटप्याने देणार, अर्थसंकल्पात तरतूद 

मुंबई : प्रशासकीय पातळीवर मंजूर होणाऱ्या नागरी कामांची संख्या कमी करुन राज्यातील कंत्राटदारांची ७४ हजार कोटी रुपये थकबाकी कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार असल्याची माहिती वित्त विभागाच्या एका उच्च अधिकाऱ्याने दिली. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या योजनेसाठी द्याव्या लागणाऱ्या निधीमध्ये घट होणार आहे. हा निधी ग्रामीण भागातील नागरी कामे व कंत्राटदारांची थकबाकी देण्यासाठी वळविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जवळपास तीन लाख छोटे मोठे कंत्राटदार शासकीय कामे करीत असतात. जलसंपदा, सार्वजनिक विभाग, शिक्षण विभागात ही कामे जास्त आहेत. त्यांनी केलेल्या नागरी कामांची थकबाकी ९० हजार कोटीच्या घरात गेली होती. ती टप्याटप्याने कमी करुन आता ७४ हजार कोटी पर्यंत खाली आली आहे. ही थकबाकी वाढल्याने ग्रामीण भागात कंत्राटदार शासकीय कामे करीत नसल्याचे चित्र आहे. मान्सूनपूर्वे कामे न झाल्यास काही ठिकाणी गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. राज्याची आर्थिक शिस्त पूर्वपदावर आणण्यासाठी वित्त विभागाने काही उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार नवीन योजना सुरु करण्यापूर्वी जुन्या योजनांचा आढावा घेऊन त्या बंद करण्याविषयी प्रस्ताव तयार केले जात आहेत. सत्तरच्या दशकातील काही योजना आजही सुरु आहेत. 

प्रशासकीय खर्चावर मर्यादा आणणे, राज्यातील सार्वजनिक उपक्रम तोटयात असल्यास त्यांची पुर्नरचना करण्याचे विचारधीन आहे. वाढलेल्या कर्जावर आणि महसुली तुटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. राज्याचे मुख्य सचिव राजेश आग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपाययोजना वित्त विभाग करीत असून राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्याचे काम सुरु आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्याही नवीन योजनांची घोषणा केली जाणार नाही असे संकेत वित्त विभागाने दिले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket