नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » जनता दरबारात ७९ तक्रारींचा निपटारा देशमुखनगर येथे उपक्रम : आ. मनोजदादांकडून समस्यांचे निराकरण

जनता दरबारात ७९ तक्रारींचा निपटारा देशमुखनगर येथे उपक्रम : आ. मनोजदादांकडून समस्यांचे निराकरण

जनता दरबारात ७९ तक्रारींचा निपटारा देशमुखनगर येथे उपक्रम : आ. मनोजदादांकडून समस्यांचे निराकरण

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. मनोजदादा घोरपडे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी देशमुखनगर (ता. सातारा) येथे आयोजित केलेल्या जनता दरबारात एकूण ११७ तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी तब्बल ७९ तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला. देशमुखनगर परिसरातील ग्रामस्थांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा जनता दरबार यशस्वी ठरला.

जनता दरबारात उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी निलेश पाटील, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक तुषार पाटील, नायब तहसीलदार विजयकुमार धायगुडे, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, सपोनि धोंडीराम वाळवेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी संतोष पवार, सातारा ग्रामीण वीज वितरण कार्यालयाचे उप अभियंता सिकंदर

 नागरिकांनी मानले आ. मनोजदादांचे आभार

नागठाणे व वर्णे गटातील सर्व महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या विविध अडचणी मांडल्या. समस्यांचे गा-हाणे गायले. आ. मनोजदादा घोरपडे यांनी हे सर्व प्रश्न समजावून घेत जागीच सोडवले. काही प्रश्न मार्गी लावण्याची प्रक्रिया केली. समस्या जागेवरच सुटल्याने नागरिकांनी आ. मनोजदादा घोरपडे यांचे आभार मानले.

मुलाणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यशवंत ढाणे, बाबासाहेब घोरपडे, सचिन देशमुख, शैलेंद्र आवळे, राहुल गायकवाड, अजय अवताडे, अॅड. धनाजी जाधव पाटील, ज्ञानदेव निकम, सुधीर जाधव, पृथ्वीराज निकम, संतोष घाडगे, विठ्ठल देशमुख, प्रशांत कणसे उपस्थित होते. आ. मनोज घोरपडे म्हणाले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.

गावोगावी विकासकामे राबवण्यासाठी जनतेचे सहकार्य अत्यावश्यक आहे. महसूल, वीज व भूमी अभिलेख विभागाशी संबंधित तक्रारींची संख्या जास्त असली, तरी या जनता दरबारामुळे सामान्य नागरिकांचा त्रास कमी झाला असून समस्या तत्काळ निकाली काढण्याचा माझा प्रयत्न कायम राहील. सेवा पंधरवडा या निमित्ताने शेतीतील पाणंद रस्ते खुले करण्याबाबत लोकाभिमुख उपक्रम शासनाचा सुरू आहे. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी सजग राहून प्रशासनास सहकार्य करावे.

यावेळी तहसीलदार समीर यादव व गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी सेवा पंधरवडा उपक्रमाबाबत माहिती देत ग्रामपंचायतींच्या योजना व रस्ते विकासाच्या कामांचा आढावा मांडला. सूत्रसंचालन माजी सरपंच प्रशांत कणसे यांनी केले. विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी हजर होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket