32 वर्षे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा; मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा वर्धापन दिन 15 ऑगस्टला
सातारा -15 ऑगस्ट 1994 रोजी मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा या संस्थेची स्थापना कै. महादेव चव्हाण यांनी केली. संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींना अल्प फी मध्ये रोजगार अभिमुख दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करून भारताचा एक जबाबदार नागरिक बनविणे हे आहे.
ही संस्था गेली बत्तीस वर्ष झाली दिमाखदारपणे सातारा नगरीमध्ये नवीन नवीन उपक्रम राबवित उत्कृष्टरित्या कार्यरत आहे.संस्थेमध्ये Bsc Hospitality Studies तीन वर्ष डिग्री पॅटर्न यूजीसी मान्यता प्राप्त विद्यापीठाची मान्यता असणारे सातारा जिल्ह्यातील एकमेव कॉलेज आहे.
या अभ्यासक्रमास महाडीबीटी स्कॉलरशिप- SC,ST व अल्पसंख्यांक (NSP) स्कॉलरशिप मिळते. त्याचबरोबर एससी एसटी विद्यार्थ्यांना स्वधार योजना (हॉस्टेल व मेस स्कॉलरशिप) देखील मिळते या व्यतिरिक्त डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट दोन वर्ष दहावी पात्रता व सी.सी इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी बारावी पास पात्रता असणारे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ मुंबई (MSBVE) मान्यता प्राप्त डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन वास्तुशास्त्र आरेखक दोन वर्ष डिप्लोमा फॅशन डिझाईनिंग दोन वर्ष सी.सी कन्स्ट्रक्शन सुपरवायझर एक वर्ष पात्रता दहावी पास अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. (MSBTE) उच्चतंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचा डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईनिंग अँड डेकोरेशन दोन वर्ष कालावधी दहावी पास पात्रता असणारा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
संस्थेची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे डिजिटल क्लास, तज्ञ प्राध्यापक, भरपूर प्रॅक्टिकल्स, इंडस्ट्री विजिट्स ऍडव्हान्स किचन रेस्टॉरंट बार हाउसकीपिंग रूम एसटी पास होस्टेल संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना प्लेसमेंटची संधी दिली जाते व कॅम्पस मधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात गेली तीस वर्षे झाली ही संस्था अग्रेसर आहे. अनेक विद्यार्थी देश विदेशात कार्यरत आहेत हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना ट्रेनिंग प्लेसमेंट साठी संस्थेत मॉरिशस, मलेशिया, दुबई, कतार, ओमान, USA ऑस्ट्रेलिया, ब्राझील, अशा ठिकाणी संस्थेचे विद्यार्थी ट्रेनिंग प्लेसमेंट करत आहेत. त्याचबरोबर क्रूज लाईन रेल्वे मिलिटरी सरकारी खाजगी एकरित्यापाहता संस्थेचे विद्यार्थ्यांनी साता समुद्रपार मंजूचा झेंडा विद्यार्थ्यांनी लावला आहे. त्यासाठी संस्था उत्कृष्ट प्रयत्न करीत आहे. त्यासाठी संस्था विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे म्हणून संस्थेत संस्थेचा गेली बत्तीस वर्षाचा आलेख पाहता उंचावत आहे. यासाठी संस्था विद्यार्थी व पालकांचे मोठे सहकार्य लाभले आहे म्हणून ही संस्था तीस वर्ष पूर्ण करून 32 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे वर्धापन दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सत्यनारायण महापूजा, रक्तदान, शिबीर, रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा आर्किटेक्चर व इंटेरिअर मॉडेल मेकिंग स्पर्धा, आकर्षित एम्ब्रोईडरी स्केचिंग स्पर्धा यांचे आयोजन केले आहे. तरी सर्व माझी विद्यार्थी व पालक यांनी संस्थेच्या कार्यालयामध्ये येऊन सत्यनारायण पूजेचा प्रसादाचा लाभ घ्यावा व संस्थेचे प्राचार्य श्री अनिल चव्हाण व संस्थापिका सौ. अमृता चव्हाण यांनी आवाहन केले आहे की सर्व शाहुवासियांना हेच निमंत्रण समजून संस्थे मध्ये येऊन शुभेच्छा देऊन प्रसाद घ्यावा ही विनंती.





