२९ मार्चला रयत माऊली सौ.लक्ष्मीबाई पाटील यांची ९५ व्या पुण्यतिथी
प्रमुख अतिथी लोकनेते रामशेठ ठाकूर,व डॉ.अनिल पाटील,चंद्रकांत दळवी,मान्यवरांची उपस्थिती
सातारा : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी रयत माऊली सौ.लक्ष्मीबाई पाटील यांच्या ९५ पुण्यतिथीचा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या स्थानिक शाखांच्या वतीने शनिवार दिनांक २९ मार्च २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता धनिणीच्या बागेतील श्री.छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस नंबर १ येथे आयोजित करण्यात आलेला आहे.सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे निधन ३० मार्च १९३० ला गुढी पाडव्याच्या आदल्यादिवशी झालेले होते. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशीच कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकात दळवी यांचे अध्यक्षेखाली होत असून प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते मा. रामशेठ ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत. रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ.अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. या कार्यक्रमास सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या संकुलातील विविध शाखांचे प्रमुख शिक्षक ,देणगीदार ,विद्यार्थी उपस्थित राहत असून शिक्षणप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे से आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केलेले आहे.
