अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » २० वर्षांची वाट…आणि अखेर रस्त्याचे खड्डे भरताना नागरिकांच्या डोळ्यात पाणी

२० वर्षांची वाट…आणि अखेर रस्त्याचे खड्डे भरताना नागरिकांच्या डोळ्यात पाणी

२० वर्षांची वाट…आणि अखेर रस्त्याचे खड्डे भरताना नागरिकांच्या डोळ्यात पाणी

महाबळेश्वर प्रतिनिधी –मुनव्वर व जिजामाता सोसायटीकडे जाणारा रस्ता मिळावा म्हणून नागरिकांनी तब्बल २० वर्षे प्रतीक्षा केली. अनेकदा पाठपुरावा, अर्ज-निवेदने आणि विनंत्या केल्यानंतर अखेर नगरसेवक कुमार शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून हा रस्ता मंजूर झाला. पण आज या रस्त्याची अवस्था अशी झाली आहे की, त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे विनंती करूनही प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींनाच स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून खड्डे भरावे लागले.

गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. रस्त्याला तीव्र उतार असल्यामुळे अनेकदा लहान-मोठे अपघात झाले. रोज या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. सोसायटीचे चेअरमन व सभासदांनी वारंवार नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना अर्ज देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली. नवनिर्वाचित नगराध्यक्षांची भेट घेऊनही विनंती करण्यात आली. श्री गणेश जयंतीपूर्वीही रस्ता दुरुस्त करावा अशी आर्त मागणी करण्यात आली; मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.

रस्त्याची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत असताना आणि एखादा मोठा अपघात घडण्याची भीती वाढत असताना अखेर प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक कुमारभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका सौ.विमलताई बिरामणे यांचे चिरंजीव विजयभाऊ बिरामणे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या खर्चाने वाळू, खडी आणि सिमेंट आणून स्थानिक रहिवाशांना सोबत घेत रस्त्यावरील मोठमोठे खड्डे सिमेंटने भरून काढले.

खड्डे भरताना काही नागरिकांच्या डोळ्यात पाणी तरळले. “२० वर्षे वाट पाहून मिळालेला रस्ता असा उद्ध्वस्त झालेला पाहणे वेदनादायक आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रशासनाने लक्ष न दिलेल्या या रस्त्यासाठी अखेर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्र येत पुढाकार घेतल्याने संभाव्य अपघात टळले असले तरी प्रशासनाने आता तरी या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

“अशा कठीण वेळी आमच्यासोबत उभे राहणारे लोकप्रतिनिधी मिळणे हे आमचे भाग्य,” अशा शब्दांत नागरिकांनी कुमारभाऊ शिंदे आणि विमलताई बिरामणे यांचे आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket