18 वर्षांच्या तरुणीवरील गँगरेप प्रकरणात 14 जणांना अटक; शेजारी-मित्र यांचाही समावेश
केरळच्या पथनमथिट्टामध्ये 18 वर्षांच्या एका विद्यार्थिनीबरोबर झालेल्या लैंगिक शोषण आणि गँग रेप प्रकरणात पोलिसांनी 14 आरोपींना अटक केली आहे.तीन ते चार वर्षांदरम्यान तिच्याबरोबर हा प्रकार घडल्याचं पीडित विद्यार्थिनीनं म्हटलं आहे.या विद्यार्थिनीनं कुटुंबश्री स्नेहिता इनिशिएटिव्ह मध्ये झालेल्या काऊन्सिलिंगदरम्यान समुपदेशकांना पीडित विद्यार्थिनीनं ही आपबीती सांगितली. तसंच तिच्याबरोबर लैंगिक शोषण करणाऱ्यांबद्दलही तिनं सांगितलं होतं.या पीडितेचं शोषण करणाऱ्यांमध्ये तिचे शेजारी, वर्गमित्र आणि काही अनोळखी लोकही होते, असं तिनं सांगितलं होतं.
पथनमथिट्टा पोलिसांनी या प्रकरणी पाच गुन्हे दाखल केले आहेत. काही आरोपी इतर जिल्ह्यांमधील असल्याचंही सांगितलं जात आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.