बारावी परीक्षेत दिशा ॲकॅडमीचे घवघवीत यश
१२ वी बोर्डाच्या निकालानंतर स्पर्धात्मक युगातील करिअर घडविण्याचा खरा प्रवास सुरू होतो. त्यामुळेच उत्तम तयारी करत परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येअधिकाधिक मार्क्स मिळविण्याची चढाओढ दिसते. नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वी परीक्षेच्या निकालात दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण तयारीनिशी प्रयत्न करून उत्तम यश मिळवले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालात सृजल सामंत याने ९२.१७% गुण मिळवत दिशा ॲकॅडमीत पहिले स्थान पटकावले आहे. वेदांत पडवळ, श्रावणी पवार, यश निकम, रिया जमदाडे, यशराज साळुंखे अनुक्रमे २ ते ५ क्रमांकावर आहेत.
दिशाच्या २९ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत, तर ७० ते ८० टक्क्यांपर्यंत गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६७ आहे. दिशाच्या ६२ विद्यार्थ्यांनी फस्टक्लास विथ डिस्टिंक्शन मिळवले आहे. १२७ विद्यार्थ्यांनी फस्टक्लास तर ५२ विद्यार्थ्यांनी सेकंड क्लास मिळविला आहे.
यंदाच्या १२ वी बोर्डाच्या निकालात आमच्या २४१ विद्यार्थ्यांनी मिळविलेले घवघवीत यश हे त्यांनी यशस्वी करिअरकडे घेतलेली गरूडझेप आहे असे सांगत दिशा ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदन यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वप्नांचा वेध घेतांना प्रयत्नांची पराकष्टा करण्यात आमचे विद्यार्थी सतत पुढे असतात, त्यासाठी आमचे शिक्षक झोकून काम करतात. विद्यार्थ्यांचे परिश्रम, विभागप्रमुख प्रा. सतिश मौर्य यांचे उत्तम नियोजन व शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी यांची साथ यांची एकत्रित गोळाबेरीज म्हणजेच दिशाच्या यशाची उंचावत जाणारी कमान असल्याचे सांगून प्रा. रूपाली कदम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
दिशाच्या यशाचा आनंद ॲकॅडमीत जोरदारपणे साजरा होत असताना समाजातील विविध स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रा. सतिश मौर्य, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांना अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.
