Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाई ऊत्कर्ष पतसंस्थेच्या तरुणाचा डॉल्बीच्या आवाजाने मृत्यू कर्मचारी, नागरिकांमध्ये संतापाची लाट

वाई ऊत्कर्ष पतसंस्थेच्या तरुणाचा डॉल्बीच्या आवाजाने मृत्यू कर्मचारी, नागरिकांमध्ये संतापाची लाट

वाई ऊत्कर्ष पतसंस्थेच्या तरुणाचा डॉल्बीच्या आवाजाने मृत्यू कर्मचारी, नागरिकांमध्ये संतापाची लाट .

वाई, प्रतिनिधी :रविवार पेठेतील हेमंत करंजे या युवकांचा डॉल्बीच्या  आवाजाने मृत्यू झाला होता. या अनुषंगाने येथील उत्कर्ष पतसंस्थेच्या वतीने पोलीस ठाण्यास न्यायालयाने नेमून दिलेल्या डेसिबल पेक्षा जास्त आवाज असणाऱ्या डॉल्बी मालक, चालक व आयोजकांवर कठोर कायदेशीर व ठोस कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन वाई पोलिसांना देण्यात आले.

     निवेदनात म्हटले आहे की, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाई शहरात डॉल्बीच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये जवळपास चार ते पाच डॉल्बीमध्ये आवाजाची चुरस लागल्याने वाई शहर दणाणून गेले होते. यामुळे वाई शहरातील वयोवृद्ध व लहान बालके तसेच आजारी रुग्णांचा काळजाचा थरकाप उडाला होता. 

वाई शहराच्या प्रत्येक आळीत रुग्णालये आहेत याचे भान डॉल्बी मालक, चालक व आयोजकांना नव्हते व राहिलेले नाही. डॉल्बीच्या कर्कश्य आवाजात मिरवणूक सुरु असताना त्यांच्यामध्ये आवाजाची स्पर्धा निर्माण झालेली होती व होत आहे. यातूनच अनेक गंभीर दुर्घटना होत आहेत व घडल्या आहेत. डॉल्बीच्या कर्कश्य आवाजाची डेसिबल मर्यादा ओलांडल्याने वाईतील समस्त नागरिक त्रस्त झालेले आहेत.

अनेकांना डॉल्बीच्या मोठ्या आवाजाचा त्रास होत आहे व याबद्दल खूप लोकांच्या तक्रारी आहेत. तसेच डॉल्बीच्या मोठ्या आवाजाने अनेक लोकांचे बळी गेलेले आहेत.

यामुळे मा. न्यायालयाने नेमून दिलेल्या कायदेशीर नियमावली प्रमाणे डेसिबल नुसार डॉल्बीचा आवाज ठेवण्यात यावा अन्यथा आवाजाच्या डेसिबल मर्यादेचे उल्लंघन झाल्यास त्यांचेवर कठोर कायदेशीर व ठोस कारवाई वाई पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक जितेंद्र शहाणे यांनी करावी याबाबतचे निवेदन उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षा मा.अनुराधा कोल्हापूरे, संचालक, मुख्याधिकारी पवार सर, अधिकारी आणी कर्मचाऱ्या  सह समस्त वाईकर नागरिकांनी एकत्र येवून दिले आहे. दिलेल्या या निवेदनाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली नाही तर मोठे आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी. असेही निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना

ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना सातारा : बांधकाम व बिनशेती प्रकरण देणे जलद गतीने होणेसाठी शासनाने ऑनलाईन

Live Cricket