कुंभारगाव येतील जागृती गणेश मंडळाचे उत्सवाचे यंदाचे 50 वे वर्ष
प्रतिनिधी -कुंभारगाव येतील जागृती गणेश मंडळाने उत्सवाला पन्नास वर्षे पूर्ण केली.लोकमान्य टिळकांनी ज्या पवित्र हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला होता त्याच पवित्र उद्देशाने जागृती गणेश मंडळ कुंभारगाव यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत.
अध्यात्मिक परंपरा लाभलेल्या या गावात अनेक सण उत्सव नेहमीच शासकीय नियम पाळून व विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरे केले जातात.या वर्षीही जागृती गणेश मंडळाने रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची रक्तदान शिबिर, लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा दररोज विविध उपक्रम आयोजित केले आहेत.
अध्यक्ष रमेश तवटे,उपाध्यक्ष नारायण सावेकर खजिनदार कैलासवासी रामचंद्र देवळेकर उरुणकर आप्पा ,सागावकर बापू ,रत्नाकर सागावकर, स्वामी दादा ,खटावकर आप्पा, श्याम स्वामी, विजय कचरे या प्रमुख कार्यकर्त्यांनी मंडळाची मुहूर्तमेढ रोवली होती. आज मंडळाचे तरुण कार्यकर्ते विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत आहेत. सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जागृती गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
