स्वसंरक्षणासाठी मुलींनी कराटे प्रशिक्षण घेणे गरजेचे: श्रीरंग काटेकर
गौरीशंकरच्या सुखात्मे स्कूलमध्ये कराटे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन: ६० मुलींचा सहभाग.
लिंब :बदलापूर (ठाणे) येथे मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे पालक वर्गांना आपल्या पाल्याच्या सुरक्षेबाबत चिंता वाटू लागली आहे. संपूर्ण राज्यात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर वर असताना याबाबत गौरीशंकरच्या डॉ. पी. व्ही. सुखात्मे स्कूलने पुढाकार घेत मुलींसाठी स्वतंत्र कराटे प्रशिक्षण वर्गाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा लाभ मुलींनी घ्यावा असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केली आहे. ते लिंब ता.जि. सातारा येथील गौरीशंकरच्या डॉ पी व्ही सुखात्मे स्कूल लिंब येथे कराटे प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी स्कूलचे प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण, कराटे प्रशिक्षक (ब्लॅक बेल्ट) संतोष माने आदी उपस्थित होते.
श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की, मुलींच्या सुरक्षेबाबत विविध उपाय योजनांबाबत संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप व प्रशासकीय अधिकारी नितिन मुडलगीकर हे संवेदनशील असून त्यांच्या पाठबळाच्या जोरावरच स्कूलमध्ये कायमस्वरूपी कराटे प्रशिक्षण वर्गाची सुरुवात केली आहे.
प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण म्हणाले की, कराटे खेळातून स्वतःचा आत्मविश्वास उंचावतो तसेच शारीरिक तंदुरुस्ती साठी ते पूरक ठरते पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व मुलींचा यामधील सहभाग स्तुत्य आहे.
प्रारंभी कराटे खेळाचे महत्व व त्याचे भावी जीवनात फायदे याविषयी कराटे प्रशिक्षक माने यांनी मार्गदर्शन केले.
संपूर्ण राज्यात शालेय व महाविद्यालय स्तरावर मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पालक वर्गात चिंता वाढत आहे. प्रत्येक येणाऱ्या संकटाला आपल्या पाल्यानी धैर्याने सामोरे जाण्यासाठी स्वसंरक्षणाचे धडे मुलींनी घेणे गरजेचे आहे प्रास्ताविक व आभार शैला शिंदे यांनी केले.
