Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाई विधानसभा घराणेशाही विरोधात शिवसेना ताकतीने लढणार

वाई विधानसभा घराणेशाही विरोधात शिवसेना ताकतीने लढणार 

वाई विधानसभा घराणेशाही विरोधात शिवसेना ताकतीने लढणार 

उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने यांची भूमिका , महायुतीला सुरुंग लागण्याची शक्यता

खंडाळा :  वाई विधानसभा हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेचा आहे. त्यामुळे शिवसेनेने हा मतदारसंघ धनुष्यबाण या चिन्हावर लढवला पाहिजे. वास्तविक युतीमध्ये शिवसेनेचा हा अधिकार आहे. त्यामुळे पक्षाकडे आपण विधानसभेसाठी मागणी करणार असून वाई विधानसभा शिवसेना ताकतीने लढणार असल्याची भूमिका सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने यांनी स्पष्ट केली. 

       खंडाळा येथे पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी तालुकाप्रमुख महेश शेळके, संघटक सचिन आवारे, सचिव दत्तात्रय राऊत , विभागप्रमुख कृष्णा बरकडे , शहरप्रमुख गुडडू खान यासह प्रमुख उपस्थित होते. वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामे झाली आहेत. खंडाळा तालुक्यातील ट्रामा केअर सेंटर , तालुका क्रीडा संकुल , शिरवळचा अंतर्गत विकास तसेच वाई तालुक्यातील काळुबाई रस्ता कॉंक्रिटीकरण , कृष्णा नदीवरील पूल , धोम व पश्चिम भागाला जोडणारे अनेक पूल आणि महाबळेश्वर तालुक्यातील क्षेत्र महाबळेश्वरसाठी १२० कोटी , प्रतापगड उभारणीसाठी १५० कोटी, तापोळा व कांदाटी खोरे जोडण्यासाठी अनेक पूल आणि पर्यटन विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिलेला आहे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व या मतदारसंघात वाढलेले आहे. कार्यकर्त्यांची मागणी आणि सर्वसामान्य जनतेचा कौल लक्षात घेऊन यावेळी वाई विधानसभा ताकदीने लढण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे.

       वाई विधानसभा मतदारसंघात वर्षानुवर्ष घराणेशाही चालू आहे. एकाच घरामध्ये अनेक पदे ही सध्याची वस्तुस्थिती आहे. स्वतःला जननायक म्हणून घेणारे आमदार यांना मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवता आले नाहीत. वास्तविक विधानभवनात गुपचिळी भूमिका घेणेच त्यांनी पसंद केले आहे. कोणत्याही प्रश्नावर आवाज उठवला नाही. उलट सेनेच्या माध्यमातून झालेल्या अनेक कामांचे श्रेय घेण्यासाठी त्यांची उठाठेव सुरु असते.      

          खंडाळा तालुक्यातील सिंचन योजना, शिरवळ लोणंद रस्त्याच्या भुसंपादनाचा प्रश्न, पारगाव उड्डाण पूल, पश्चिम भागातील १४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हे अद्यापही सोडवण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे अशा नाकर्त्या आमदारांच्या विरोधात जनमत तयार झालेले आहे. या सर्व बाबींचा विचार करून शिवसेना आपल्या कामाच्या बळावर हा मतदारसंघ लढेल. या मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. 

॥  महायुतीनंतरही विद्यमान आमदारांनी इतर पक्षांना विचारात घेतले नाही उलट अडवणूकीची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याचा संबंधच येत नाही. वाई मतदारसंघात शिवसेनेला वातावरण चांगले आहे. या ठिकाणी सेनेचे संघटन मजबूत केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन आपण विधानसभा लढविण्याचा निश्चय केला आहे. ॥ प्रदीप माने , उपजिल्हाप्रमुख 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 18 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket