सातारा शहरातील कायम दुर्लक्षित शाहूनगर मधील पाणी समस्या गंभीर
सातारा – शाहू नगर मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी समस्या ही गंभीर होत आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पंपिंग स्टेशन मध्ये लाईट नसणे. वारंवार लाईट नसणे हेच कारण जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते, मात्र त्यावर कोणताही उपाय केला जात नाही.
पाणी हा नागरिकांच्या अति महत्त्वाचा विषय आहे व त्यासाठी कायमस्वरूपी न जाणारी वीज कनेक्शन घेणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने कलेक्टर ऑफिस मधील लाईट कधी जात नाही तसेच निम्म्या सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरण च्या पंपिंग स्टेशन मधील देखील लाईट अशाच न जाणाऱ्या लाईनवरून घेतल्यास ही तक्रार कायमची संपुष्टात येईल.त्यासाठी आज जय सोशल फाउंडेशन च्या वतीने उपाध्यक्ष सतीश यादव यांनी जीवन प्राधिकरण ला अशा प्रकारचे निवेदन दिले आहे.
लवकरात लवकर त्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात अशी विनंती करण्यात आली आहे. मात्र तसे न झाल्यास सर्व शाहूनगर वासियांना घेऊन जीवन प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा सतीश यादव यांनी दिला आहे.