Home » राज्य » शिक्षण » यशोदा पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण यश

यशोदा पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण यश 

यशोदा पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण यश 

यशोदा पब्लिक स्कूल, सातारा चा विद्यार्थी मयुरेश मंगेश जाधव याने सीबीएसई साऊथ झोन बॉक्सिंग स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे. ही स्पर्धा एमडीएन स्कूल, लाखनी, जि. भंडारा येथे नुकतीच पार पडली. 70-75 किलो वजनगटात अंडर-17 या गटात सहभागी झालेल्या मयुरेशने आपल्या जोरदार आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाने सर्व सामना RAC (Referee stops Contest) द्वारे पहिल्याच फेरीत जिंकत सुवर्णपदक पटकावले. या अपूर्व यशामुळे त्याची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे यश हे संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी गौरवाचे आहे.

शालेय स्तरावर खेळाच्या माध्यमातून घडणारी ही प्रगती हे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडविण्याचे उत्तम उदाहरण आहे. मयुरेशची ही यशस्वी कामगिरी यशोदा पब्लिक स्कूलच्या सशक्त खेळ संस्कृतीचे आणि उत्कृष्ट मार्गदर्शनाचे फलित आहे.

या यशस्वी वाटचालीमागे यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक दशरथ सगरे,उपाध्यक्ष प्राध्यापक अजिंक्य सगरे, तसेच प्राचार्य श्री. प्रदीश सर यांचे सततचे पाठबळ आणि प्रोत्साहन लाभले आहे. या यशामुळे शाळेचा लौकिक उंचावला असून संपूर्ण शाळा कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

मयुरेशने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले असून त्याच्यावर राष्ट्रीय पातळीवर पदक पटकावण्याची आशा आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी यशोदा पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक, मार्गदर्शक, विद्यार्थी व पालकवर्गाने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

शाळेच्या खेळ विभागाकडून त्याच्या पुढील राष्ट्रीय स्पर्धेची तयारी जोरात सुरू आहे. देशपातळीवर यश मिळवून महाराष्ट्र आणि सातारा जिल्ह्याचे नाव उज्वल करण्याचा निर्धार मयुरेशने केला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Post Views: 89 महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद महाबळेश्वर:महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, निवडणूक

Live Cricket