Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वरच्या पंकज कदम यांचा स्नूकरमध्ये पश्चिम महाराष्ट्र झोन विजेतेपदावर कब्जा

महाबळेश्वरच्या पंकज कदम यांचा स्नूकरमध्ये पश्चिम महाराष्ट्र झोन विजेतेपदावर कब्जा

महाबळेश्वरच्या पंकज कदम यांचा स्नूकरमध्ये पश्चिम महाराष्ट्र झोन विजेतेपदावर कब्जा

महाबळेश्वर : बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (BSAM) यांच्या वतीने महाराष्ट्र स्टेट सिलेक्शन पश्चिम महाराष्ट्र झोन 6 रेड स्नूकर टुर्नामेंट नुकतीच कोल्हापूर येथील Redz Snooker Academy येथे पार पडली.

29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेतील सामने बेस्ट ऑफ 7, तर उपांत्य व अंतिम सामने बेस्ट ऑफ 9 पद्धतीने खेळवण्यात आले.

अंतिम सामन्यात महाबळेश्वरच्या पंकज कदम यांनी कोल्हापूरच्या पीयुष लिंबड यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले. या दमदार कामगिरीमुळे पंकज कदम यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, पुढील सामने मलबार हिल, मुंबई येथे होणार आहेत.

पंकज कदम यांच्या या यशाबद्दल महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे आणि माजी चेअरमन वृषाली डोईफोडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वरच्या पंकज कदम यांचा स्नूकरमध्ये पश्चिम महाराष्ट्र झोन विजेतेपदावर कब्जा

महाबळेश्वरच्या पंकज कदम यांचा स्नूकरमध्ये पश्चिम महाराष्ट्र झोन विजेतेपदावर कब्जा महाबळेश्वर : बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (BSAM) यांच्या

Live Cricket