तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत वन वर्ल्ड समिटमध्ये यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा सन्मान सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल  मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » राज्यातील साखर कामगार १६ डिसेंबरपासून संपावर जाणार

राज्यातील साखर कामगार १६ डिसेंबरपासून संपावर जाणार

राज्यातील साखर कामगार १६ डिसेंबरपासून संपावर जाणार

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )राज्य सरकारने साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांचे वेतन व सेवा शर्ती ठरविण्याबाबत त्वरित त्रिपक्ष कमिटी गठित करावी, साखर कामगारांचे थकीत वेतन मिळण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी साखर कामगारांनी १६ डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे आणि सचिव सयाजी कदम यांनी दिला आहे.

साखर कामगार प्रतिनिधी मंडळाची गुरुवारी (दि. २८) पुण्यात बैठक झाली. या बैठकीला अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्यासह सरचिटणीस शंकरराव भोसले, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील, राज्य साखर कामगार महासंघाचे अध्यक्ष कॉम्रेड पी. के. मुंडे, आनंदराव वायकर, सचिव सयाजी कदम, आदींसह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कळविली आहे.

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ ही साखर उद्योगातील नोंदणीकृत व मान्यताप्राप्त मंडळ आहे. राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील सर्व कामगारांच्या पगारवाढीच्या कराराची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपली आहे.

तत्पूर्वी पगारवाढीच्या मागण्यां बाबतच्या बदलाची नोटीस मंडळाने १० फेब्रुवारी २०२४ रोजी दिलेली आहे. याशिवाय मुख्यमंत्री, सहकारमंत्री, कामगारमंत्री, साखर आयुक्त, राज्य सहकारी साखर कारखाना संघ व अन्य यांनाही मागण्यांचा मसुदा २७ फेब्रुवारी रोजी पाठवूनही प्रतिसाद मिळालेला नाही.

भाडेतत्त्वावर व भागीदाराने व विक्री केलेल्या तसेच खासगी साखर कारखान्यातील कामगारांना त्रिपक्षीय समितीच्या कराराप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे व त्यांच्या थकीत पगाराची रक्कम अग्रक्रमाने मिळाली पाहिजे. याबाबत स्थानिक संघटनांची मान्यता घेऊनच करार करावा. तसेच, शेती महामंडळातील कामगारांचे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करावी, अशाही मागण्या मंडळाचे अध्यक्ष काळे व सरचिटणीस शंकरराव भोसले यांनी शासनाकडे केलेली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त

तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त (स्थानिक गुन्हे शाखा साताराची कारवाई) तडीपार इसमास जेरबंद करुन

Live Cricket