गायिका अलका याज्ञिक यांना ऐकू येणे झाले बंद
ज्येष्ठ गायिका अलका याज्ञिक यांनी सोशल मीडियावरून खूप मोठी बातमी शेअर केली आहे. अलका याज्ञिक यांनी त्यांना दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व्ह श्रवणशक्ती कमी झाल्याचे निदान झाले असल्याचे सांगितलं आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, यामुळेच त्या काही काळ सिनेविश्वापासून दूर होत्या.
त्यांनी असेही सांगितले की, ही मला माहिती कळताच मोठा धक्का बसला आणि त्या अजूनही त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. अलका याज्ञिक यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर येताच त्यांचे चाहते काळजी व्यक्त करताना दिसत आहेत.
अलका याज्ञिक यांनी म्हटले की, एका विमान प्रवासातून त्या बाहेर आल्या आणि त्यांना काही ऐकू येईनासं झालं असं त्यांनी म्हटले. हा एक मेंदूचा दुर्मिळ आजार आहे, सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस असं निदान डॉक्टरांनी केले आहे. कानात मोठ्याने आवाज सतत ऐकल्यामुळे हा आजार बळावला असं त्यांनी म्हटले. त्यामुळे मोठ्याने हेडफोनवर गाणी ऐकणं टाळा असे आवाहनही त्यांनी केलं आहे.
हेडफोनद्वारे मोबाईल मधील गाणी ऐकताना ऐकणे ही बंद होऊ शकते. त्यामुळे मोबाईल मधून हेडफोन द्वारे गाणे ऐकणे टाळणे गरजेचे आहे.