कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे ‘वर्ल्ड हेरिटेज वीक २०२६’ निमित्त विशेष उपक्रम साताऱ्याच्या तीन शिलेदारांची मलेशियाला झेप! सक्सेस अबॅकसच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड सातारा जिल्ह्यातील ५ हजार ५७८ शेतकरी एकवेळ समझोता योजनेस पात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत लाभार्थी याद्या प्रसिद्ध राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची अवैध हातभट्टी दारुचे वाहतुकीवर धडक कारवाई 5 लाख 22 हजार 200 रुपयांचा मुददेमाल जप्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळार्फत कर्ज योजना
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी

कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी

कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी

मसूर,दि.२२(प्रतिनिधी) : -कराड तालुका कलाक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत, ‘आस क्रिएशन’ निर्मित आणि संतोष पाटील व श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” या लघुपटाची प्रतिष्ठित ‘शिवप्रहार राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव २०२६’ साठी अधिकृत निवड (Official Selection) झाली आहे. देशभरातून आलेल्या दर्जेदार लघुपटांमधून कराडच्या भूमिपुत्रांनी ही दमदार बाजी मारली असून, सर्वत्र या यशाचे कौतुक होत आहे.

         अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या ‘शिवप्रहार राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव २०२६’ अंतर्गत ‘माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लघुचित्रपट स्पर्धेची’ घोषणा २ ऑगस्ट रोजी आमदार बच्चू कडू व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश अबीटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. यामध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग मंत्रालय, आरोग्य योजना, सत्ता परिवर्तन तसेच एकनाथ शिंदे यांचा सर्वसामान्य ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास अशा विविध विषयांवर लघुपट मागवण्यात आले होते. या स्पर्धेसाठी १७० हून अधिक लघुपट पाठवण्यात आले होते, त्यापैकी स्पर्धेस पात्र ९५ लघुपटांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचा अंतिम निकाल जानेवारीमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर होणार आहे. यासोबतच खुली लघुचित्रपट स्पर्धाही आयोजित करण्यात आली असून, या दोन्ही स्पर्धांचा एकत्रित पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार असल्याची माहिती लघुचित्रपट स्पर्धेचे प्रमुख संदीप मोहिते पाटील यांनी दिली.

“आरंभकडा” या लघुपटाची तांत्रिक बाजू अत्यंत भक्कम आहे. या लघुपटाचे लेखन अमोल संकपाळ यांनी केले असून, कला दिग्दर्शनाची जबाबदारी सिद्धेश नेवरेकर यांनी सांभाळली आहे. लघुपटाला अभिषेक सकटे यांचे प्रभावी संगीत लाभले आहे. तर छायाचित्रण (डी. ओ. पी.) पोपट सानप, नितीन गायकवाड आणि अमोल यादव यांनी उत्कृष्टरीत्या हाताळले आहे.

    या लघुपटात विजय देशमुख, मयुरी वारे, सदानंद साठे, विजय सोनवले, सनी कवळे, उदय माळी, श्रीकांत वारे आणि अमोल संकपाळ या कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तसेच, जान्हवी देशमुख आणि शिवराज वारे या बाल कलाकारांनीही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.

          राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत कराडमधील कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल संपूर्ण कराड परिसरातून व चित्रपट रसिकांकडून ‘आरंभकडा’च्या संपूर्ण टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी

कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची

Live Cricket