साताऱ्याच्या तीन शिलेदारांची मलेशियाला झेप! सक्सेस अबॅकसच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड सातारा जिल्ह्यातील ५ हजार ५७८ शेतकरी एकवेळ समझोता योजनेस पात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत लाभार्थी याद्या प्रसिद्ध राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची अवैध हातभट्टी दारुचे वाहतुकीवर धडक कारवाई 5 लाख 22 हजार 200 रुपयांचा मुददेमाल जप्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळार्फत कर्ज योजना अफझल खान कबर परिसरात 163 कलम लागू खेत बचाओ अभियानास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद १४८ गावांतील ५,५०० शेतकऱ्यांचा सहभाग
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळार्फत कर्ज योजना

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळार्फत कर्ज योजना

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळार्फत कर्ज योजना

सातारा : सन 2024-25 व 2025-26 या वित्तीय वर्षात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार सातारा जिल्हयासाठी सन 2024-25 साठी 30 कर्ज प्रकरणे व 2025-26 करिता 50 कर्ज प्रकारांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते.

जिल्ह्यातील मातंग समाज व मांग गारोडी व मांग गारुडी मातंग समाज व त्यामधील 10 पोटजातीतील अर्जदारांकडून सन 2025-26 मध्ये अर्ज वितरण व स्विकारण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

मा. अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, लाभार्थी निवड समिती, सातारा यांचे दालनात दिनांक 15 जुलै 2026 रोजी लाभार्थी निवड समितीची बैठक संपन्न झाली असून यामध्ये महामंडळाच्या परिपत्राकानुसार व नियमानुसार कागदपत्रांची पुर्तता केलेल्या, Cibil Score 500 च्या वर असलेल्या, तसेच महामंडळाच्या योजनेचा यापूर्वी लाभ न घेतलेल्या अर्जदारांना पुढील प्रक्रियेसाठी पात्र करण्यात आले आहे. यामध्ये पुरुष-78 व स्त्री-60 असे एकूण 138 कर्ज प्रकरणे चिड्डी प्रक्रियेसाठी मंजूर झाले आहेत. (पात्र व अपात्र अर्जदारांची यादी कार्यालयात उपलब्ध आहे.)

शासन निर्णय सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य, क्रिडा व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक मकवा-2012/प्र.क्र.149/महामंडळ, दिनांक 14 मे, 2012 अन्वये शासनाने महामंडळाच्या लाभार्थीच्या निवडीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी लाभार्थीची निवड ही चिड्डी पध्दतीने करण्यासाठी खालीलप्रमाणे समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीचा तपशील खालीलप्रमाणे.

मा. निवासी उपजिल्हाधिकारी, सातारा अध्यक्ष, मा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सातारा सदस्य, जिल्हा व्यवस्थापक, सा.लो.अ.सा.वि.म., सातारा सदस्य सचिव

थेट कर्ज योजने अंतर्गत आर्थिक व भौतिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पात्र एकूण 138 अर्जदारांपैकी 2024-25 करिता 30 व 2025-26 करिता 50 चिठ्ठी पध्दतीने निवड करण्यासाठी मा. निवासी उपजिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, लाभार्थी निवड समिती, सातारा (चिठ्ठी पध्दत) यांनी चिठ्ठीव्दारे निवड प्रक्रियेसाठी दिनांक 23 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजताची वेळ दिलेली असून या निवड प्रक्रियेमध्ये पुरुष 50 टक्के व महिला 50 टक्के आरक्षण असणार आहे.

जिल्ह्यातील मातंग समाज व त्यामधील 10 पोटजाती, मांग- गारोडी व मांग गारुडी समाजातील समाज बांधवांनी कृपया चिठ्ठीव्दारे निवड प्रक्रियेसाठी पात्र अर्जदारांनी, दि. 23 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता, स्थळ-नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे उपस्थित राहण्याचे अहवान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (म) सातारा जिल्हा व्यवस्थापक, सुशांत संघनवट यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्याच्या तीन शिलेदारांची मलेशियाला झेप! सक्सेस अबॅकसच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

साताऱ्याच्या तीन शिलेदारांची मलेशियाला झेप! सक्सेस अबॅकसच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड सातारा( प्रतिनिधी) : बुद्धिमत्ता, जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या

Live Cricket