भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
सातारा -यावेळी उदयनराजे राजे कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात भव्य असं शक्ती प्रदर्शनकरण्यात आले. श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे हे जलमंदिर निवासस्थानातून बैलगाडीमध्ये उभं राहून अर्ज दाखल करण्यास निघाले होते. यावेळी भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा त्यांच्या सोबतीला होते. राजेंचा मनोमिलन पॅटर्न यावेळी संपूर्ण सातारकरांना भावला. उदयनराजे भोसले यांनी एबी फॉर्म भरण्याची प्रक्रिया गाडीत बसूनच पूर्ण केली आहे. साताऱ्यातील गांधी मैदानातील सजवलेल्या रथातून शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवेंद्रराजे भोसले, महेश शिंदे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अतुल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील साताऱ्यात दाखल झाले. उदयनराजे भोसले यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल असा विश्वस एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंचा विजय निश्चितच आहे असे सांगितले.