Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साताऱ्यात भरणार पहिले शिव साहित्य संमेलन शाहू कलामंदिर येथे 17 ते 19 विविध कार्यक्रम

साताऱ्यात भरणार पहिले शिव साहित्य संमेलन शाहू कलामंदिर येथे 17 ते 19 विविध कार्यक्रम 

साताऱ्यात भरणार पहिले शिव साहित्य संमेलन शाहू कलामंदिर येथे 17 ते 19 विविध कार्यक्रम 

सातारा –शिवजयंती महोत्सव समिती सातारा यांच्या वतीने दिनांक 17 ते 19 अखेर शाहू कलामंदिर येथे पहिल्या शिवसेनेचे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .दिनांक 17 रोजी सकाळी साडेदहा वाजता शिव साहित्य संमेलनाचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे यावेळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी जिल्हाधिकारी संतोष पाटील आयसीसीआर नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांची उपस्थिती आहे या सर्व कार्य क्रमांची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुरूची येथे पत्रकार परिषदेत दिली .

दिनांक 17 रोजी सकाळी छत्रपती शिवराय व स्वराज्याचे शिलेदार सौरभ करणे, थोरली मसलत शैलेश वरखडे, दुपारी शिवशाहीर यांचे पोवाडे पियुशा भोसले व सहकारी सादर करणार आहेत .यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद याशिनी नागराज यांना निमंत्रित करण्यात आले आहे .यानंतर छत्रपती युद्धनीती या विषयावर मोहन शेटे छत्रपतींचे दुर्गनीती या विषयावर प्राध्यापक प्र के घाणेकर यांचे मार्गदर्शन सत्र होणार आहे .सायंकाळी सात वाजता सांगता कार्यक्रम होणार आहे अफजलखान वध प्रसंग सारंग मांडके सारंग भोईरकर सादर करणार आहे यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना निमंत्रित करण्यात आले आहे दिनांक 18 रोजी सायंकाळी गड पूजन व किल्ले अजिंक्यतारा येथे मशाल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे .

दिनांक 19 रोजी शिवजयंती च्या मुख्य दिवशी सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे केरळचे 100 कलाकार केरळी वाद्यांसह शोभा यात्रेत सहभागी होत आहेत .शोभायात्रेत गजीनृत्य, ढोलीताशा पथक, तुतारी , हलगी वादन तसेच अनेक कलाकार आपली कला सादर करणार आहेत .उंट घोडे शोभायात्रा मिरवणुकीचे आकर्षण राहणार आहे रात्री नऊ वाजता शिवतीर्थ पोवई नाका येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची महाआरती होणार आहे . या कार्यक्रमाचा लाभ सादर करणे घ्यावा असे आवाहन शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती राजधानी साताऱ्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Post Views: 248 महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५

Live Cricket