सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल  मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी

सातारा, दि. ६ जुलै : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित तालुक्यांतील सर्व शाळांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांना घराबाहेर न पाठवता सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून नदी-नाले आणि धरणांतील पाण्याची पातळी वाढत आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये तीन दिवसीय महाकुंभ भक्ती संगम सोहळ्याची सुरुवात नाशिक, दि. २८

Live Cricket