Home » ठळक बातम्या » सातारचे भूमिपुत्र प्रा.डॉ दीपक ताटपुजे यांचा सार्थ अभिमान वाटतो – श्रीरंग काटेकर

सातारचे भूमिपुत्र प्रा.डॉ दीपक ताटपुजे यांचा सार्थ अभिमान वाटतो – श्रीरंग काटेकर 

सातारचे भूमिपुत्र प्रा.डॉ दीपक ताटपुजे यांचा सार्थ अभिमान वाटतो – श्रीरंग काटेकर 

कौशल्य विकसित मनुष्यबळ घडविणारे डॉ दीपक ताटपुजे यांचा कर्ण फाउंडेशनकङून उचित गौरव

सातारा – ग्रामीण भागातील दुर्लक्षित विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या उत्कर्षासाठी नाविन्यपूर्ण तंत्र कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम घडवण्याचा ध्यास घेऊन वाटचाल करणारे विद्यादीप फाउंडेशन सातारचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारे प्रा. डॉ दीपक ताटपुजे यांच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते कर्ण फाउंडेशन सातारा यांनी प्रा.डॉ दीपक ताटपुजे यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध विद्यापीठाच्या तज्ञ सल्लागार पदी झालेले निवडीबद्दल आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

यावेळी कर्ण फाउंडेशन सातारचे अध्यक्ष शेखर कोल्हापूरे दत्ता सांगलीकर,विजयकुमार कुलकर्णी, पत्रकार गुरुनाथ जाधव , पञकार माधव जाधव अदि प्रमुख उपस्थित होते श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की सातारच्या भूमिपुत्राने प्रतिकूलतेवर मात करीत आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्ञानक्षेञात सातारचा झेंडा फडकविला आहे.नविन्यतेचा ध्यास घेताना समाजातील सर्व घटकातील समाज बांधवांना कौशल्य विकासाने घडविणारे प्रा,डॉ दीपक ताटपुंजे समाजासाठी खरे आयङाॅल ठरले आहेत

कर्ण फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर कोल्हापुरे म्हणाले की प्रत्येक सातारकरांना अभिमान वाटावा असे कार्यकर्तृत्व प्रा.डॉ. दीपक ताटपुजे यांनी केले आहे त्यांनी नवतरुणाईला नवी दिशा देऊन रोजगार व स्वयरोजगाराचा अनमोल मंत्र देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागविला आहे प्रा.डॉ.दीपक ताटपुजे म्हणाले की सातारकर यांनी भरभरून दिलेली साथ लाभलेला स्नेह आपुलकीने मला नेहमीच प्रोत्साहन लाभले कौशल्य विकासाचे महत्त्व व त्याची उपयुक्तता याबाबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मला मिळालेला बहुमान हा प्रत्येक सातारकरचा सन्मान आहे माझ्या प्रतिकूल परिस्थितीत येथील प्रत्येकाने मला अनमोल साथ दिली आहे नजीकच्या काळात या ऋणातून उतराई होण्यासाठी साताऱ्यात नाविन्यपूर्ण कौशल्य विकासाचे अदयावत सेंटर उभारण्याचा निर्धार केला आहे.

प्रारंभी प्रा डॉ दीपक ताटपुजे यांचा गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ बुके देऊन त्यांचा उचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार शेखर कोल्हापुरे यांनी मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत

Post Views: 77 नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र

Live Cricket