दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित सुरमई शाम” दिल का साझ” मधुर गीतों का सफर कार्यक्रम
सातारा दि. 20 ( प्रतिनिधी)दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा आयोजित सुरमई शाम” दिल का साझ” मधुर गीतों का सफर कार्यक्रम दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल शनिवार पेठ सातारा येथे शनिवार दि.21 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर गीत मैफिल कार्यक्रमाचे उद्घाटन सुरेखा शेजवळ यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून डॉ.कामिनी पाटील, मुकुंद फडके, डॉ. लियाकत शेख, अनिल वाळिंबे, काका पाटील, शिरीष चिटणीस, सलीम शिकलगार मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच सदर गीत मैफिलीमध्ये सलीम शिकलगार, सलीम सय्यद, शबाना शिकलगार, शरीफ शिकलगार, मोईन शिकलगार गायक कलाकार सहभाग घेणार आहेत.
तरी “दिल का साझ ” मधुर गीतों का सफर कार्यक्रमास समस्त सातारकर रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिरीष चिटणीस यांनी केले आहे.