Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाई फेस्टिवल २०२४ अंतर्गत आयोजित शहीद जवान स्मरणार्थ भव्य सायकल रॅली संपन्न

वाई फेस्टिवल २०२४ अंतर्गत आयोजित शहीद जवान स्मरणार्थ भव्य सायकल रॅली संपन्न 

वाई फेस्टिवल २०२४ अंतर्गत आयोजित शहीद जवान स्मरणार्थ भव्य सायकल रॅली संपन्न 

वाई प्रतिनिधी -वाई फेस्टिवल २०२४ अंतर्गत आयोजित शहीद जवान स्मरणार्थ भव्य सायकल रॅली रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७.३०वा महागणपती घाट येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री अनिल देव, वाई चे ए पी आय श्री अमोल गवळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. देशाप्रती कृतज्ञतेची भावना तरुण पिढी मध्ये रुजू व्हावी, समाजाला आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणे आणि प्रदूषणमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी फेस्टिवल च्या माध्यमातून या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येते.

रॅलीमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जवळपास ५०० सायकल स्वार सहभागी झाले. रॅलीने वाई शहरातील प्रमुख रस्त्यांवरून फेरी मारली. रॅलीचा समारोप महागणपती घाट, वाई येथे झाला, जिथे सहभागी सर्व सायकल स्वर यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी खास सातारहून सायक्लिंग क्लब सातारा व सायकल वेडे ग्रुप भुईंज या दोन संस्थांचे सदस्य देखील आले होते. वाई ते केदारनाथ हा मार्ग व महाराष्ट्रातील ५ ज्योतिर्लिंग सायकल वर पादाक्रांत केलेला वाई मधील सायकल स्वार श्री वरुण गोंजारी तसेच किसनवीर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री समीर पवार सर यांचा देखील सन्मान या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. किसनवीर महाविद्यालयाचे एन सी सी चे सर्व विद्यार्थी यांनी देखील रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. वाई फेस्टिव्हल समितीने या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही असे जनजागृतीपर उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाई फेस्टिव्हल समितीचे सदस्य, स्वयंसेवक, तसेच पोलीस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी फेस्टिवलचे अध्यक्ष श्री शरद चव्हाण, कोषाध्यक्ष ॲड रमेश यादव , सचिव श्री सुनील शिंदे , निमंत्रक श्री अमर कोल्हापुरे , सदस्य श्री वैभव फुले , श्री नितीन वाघचौडे , श्री संजय वाईकर , श्री अमीर बागुल , श्री भूषण तारू , डॉ मंगला अहिवळे , सौ प्रीती कोल्हापुरे , श्रीमती अलका घाडगे, श्री श्रीकांत शिंदे , श्री प्रशांत मांढरे व उत्कर्ष पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 74 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket