तांबवे ते किरपे दरम्यान प्राची देवकर यांची मिरवणुक
तांबवे- आशियाई ज्युनियर चॅम्पियन स्पर्धेत तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक पटकालेल्या प्राची देवकर हीची किरपे ग्रामस्थांच्यावतीने मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुक काढुन ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. यादरम्यान तिचे मान्यवरांच्या हस्ते ठिकठिकाणी स्वागत करुन महिलांना औक्षण केले.
किरपे हे प्राची देवकरचे मुळ गाव आहे. घरची परिस्थीती बेताची असतानाही प्राचीने मोठ्या जीद्दीने राष्ट्रीय प्रशिक्षक अतुल पाटील यांच्याकडे हिरकणी सामाजीक क्रीडा संस्थेच्या माध्यमातुन धावण्याचा सराव संस्थेचे अध्यक्ष सलीम मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली केला. बंगळुरु येथे राष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेत सध्या ती प्रशिक्षण घेत आहे. ते घेत असतानाच प्राचीने साऊथ आशियाई ज्युनियर चॅम्पियन स्पर्धेत तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत अवघ्या नऊ मिनिट ५७.२० सेंकद वेळेत स्पर्धा पार करुन सुवर्ण पदक पटकावले. त्याबद्ल तिचा किरपे ग्रामस्थांच्यावतीने तांबवे ते किरपे दरम्यान मिरवणुक काढुन आनंदोत्सव साजरा केला. राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक अतुल पाटील हे ही मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीला तांब्यातून प्रारंभ झाला. यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष निवासराव पाटील, पाटण अर्बन बॅंकेचे उपाध्यक्ष धनंजय ताटे, शंकर पाटील, आण्णासाहेब पाटील, विठोबा पवार, कोयना काट चॅरिटेबल ट्रस्ट संचलित फुटबॉल टीम करुन तिचा सत्कार करण्यात आला. किरपेत सरपंच प्रज्ञा देवकर, पोलीस पाटील सचिन तिकवडे, माजी सरपंच संदीप माने, सुभाष माने, राजाभाऊ कोळे, भानुदास माने, अमोल देवकर,सचिन देवकर, निरंजन पाटील, सचिन चव्हाण, हंबीरराव चव्हाण, पृथ्वीराज देवकर, महादेव देवकर, अंकुश नांगरे, आकाराम मदने यांच्या हस्ते तिचा सत्कार कण्यात आला. मिरवणुकीदरम्यान महिलांनी ठिकठिकाणी तिचे औक्षण करुन पंचारतीने ओवाळले.
