अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » अन्यथा, ३० एप्रिलला वारणा धरण ते कोल्हापूर लाँग मार्च डॉ. भारत पाटणकरांचा इशारा

अन्यथा, ३० एप्रिलला वारणा धरण ते कोल्हापूर लाँग मार्च डॉ. भारत पाटणकरांचा इशारा

अन्यथा, ३० एप्रिलला वारणा धरण ते कोल्हापूर लाँग मार्च डॉ. भारत पाटणकरांचा इशारा

कराड प्रतिनिधी ( ज्ञानेश्वर शेवाळे )गुढे-पाचगणी येवती उपसा सिंचन योजनेसाठी नाशिककडून तांत्रिक मंजुरी तसेच शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याचे लेखी पत्र २९ एप्रिलपर्यंत न दिल्यास, दि. ३० एप्रिल रोजी शिराळा, कराड आणि पाटण तालुक्यातील १०५ गावातील शेतकरी सकाळी १० वाजता वारणा धरणापासून कोल्हापूर येथील कृष्णा खोरे कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. मानेवाडी, ता. शिराळा येथे आयोजित शिराळा, कराड आणि पाटण तालुक्यातील १०५ वंचित गावांच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी सभापती हणमंतराव पाटील, तानाजी पाटील, वसंत पाटील, शंकर मोहिते, शिवाजी पाटील, बाळासाहेब माने, उदय पाटील, संदीप पाटील, सचिन मोरे, सखाराम पाटील, बाबासाहेब पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. पाटणकर म्हणाले, या योजनेसाठी आंदोलन, मंत्रालयातील पाठपुरावा तसेच पुणे, कोल्हापूर आणि कृष्णा खोरे कार्यालयात झालेल्या बैठकीमुळे अनेक टप्पे पूर्ण झाले आहेत. मात्र, आता नाशिककडून आराखड्यास तांत्रिक मंजुरी आणि शासनाकडून निधीबाबत लेखी हमी मिळणे अत्यावश्यक आहे. निधी मंजूर झाल्याच्या बातम्या व जाहिरातींवर विश्वास ठेवता येत नाही. अधिकारी पातळीवर लेखी हमी न मिळाल्यास दि. ३० एप्रिल रोजी वारणा धरणापासून सकाळी १० वाजता लाँग मार्च काढून कोल्हापूरकडे मोर्चा नेण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी हणमंतराव पाटील, बाळासाहेब माने, पाटील, संदीप पाटील, सचिन मोरे, सुरेश पाटील, शिंदे, एकनाथ मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले. कराड व पाटण तालुक्यातील शेतकरी व महिला मोठ्या सखाराम पाटील, उदय शिवाजी पाटील, सुनील या मेळाव्यास शिराळा, संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket