आंबेनळी घाटातून एसटीची वाहतूक आजपासून पूर्ववत; प्रवाशांना मोठा दिलासा! स्थानिक नागरिकांचा पाठपुरावा, तहसीलदार कपिल घोरपडे यांचे प्रयत्न अन्  न्यूज मीडिया सेव्हन’च्या बातमीचा दणकेबाज ‘इम्पॅक्ट’ येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन कोयना धरण १०० टक्के भरले; सांडव्यावरून विसर्ग सुरू होण्याची शक्यता यशोदा इन्स्टिट्यूटमध्ये ‘नारीशक्ती : महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग महाबळेश्वरच्या पंकज कदम यांचा स्नूकरमध्ये पश्चिम महाराष्ट्र झोन विजेतेपदावर कब्जा दीपलक्ष्मी पतसंस्था म्हणजे ज्ञान व धनाचा संगम असणारी पतसंस्था : ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » विविध प्रश्नांसाठी जिल्ह्यातील सरपंच एकवटले

विविध प्रश्नांसाठी जिल्ह्यातील सरपंच एकवटले 

विविध प्रश्नांसाठी जिल्ह्यातील सरपंच एकवटले 

सोमवार दि.३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देणार 

सातारा -प्रतिनिधी-मस्साजोग सरपंच संतोष देशमुख, मिर्झापूरचे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा देऊन न्याय मिळाला पाहिजे. तर सरपंच, उपसरपंच, सदस्यांना मानधन आणि सरपंचांना पेन्शन मिळावी, यासाठी सातारा जिल्ह्यातील सरपंच परिषदेचे सदस्य असलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य एकवटले आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सोमवार दि.३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. निवेदन देणार आहेत.

राज्यात ग्रामविकासासाठी अव्याहत सक्रिय योगदान देणाऱ्या सरपंच परिषदेने अनेक प्रश्नांवर आवाज उठवत शासनाला अपेक्षित काम केले आहे. याच सरपंच परिषदेने कै. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोग येथे राज्यभरातील तब्बल ५०० हून अधिक सरपंचांना कुटुंबांना भेटून आधार देत या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी सोबत राहण्याची ग्वाही दिली आहे. तर कै.सोमनाथ सुर्यवंशी मार्जापूर (परभणी) येथे जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना आधार देत कायम पाठीशी असल्याचे सांगितले.

आता या दोन्ही प्रकरणाचा तपास लवकर होऊन दोषींवर कठोर कारवाई करावी,या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील सरपंच परिषदेकडून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे.

त्याच बरोबर सरपंच, उपसरपंच, सदस्यांच्या मानधन भत्ता प्रश्न आणि सरपंचांना पेन्शन मिळावी, या प्रलंबित मागण्यासाठी यावेळी निवेदन देण्यात येणार असल्याचे मार्गदर्शक शंकर बापू खापे,मंदाकिनी सावंत,सुरेखा डुबल, संतोष शेळके,सतीश इंगवले, प्रताप चव्हाण,अमर माने,विष्णू गायकवाड, आदींनी जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

आंबेनळी घाटातून एसटीची वाहतूक आजपासून पूर्ववत; प्रवाशांना मोठा दिलासा! स्थानिक नागरिकांचा पाठपुरावा, तहसीलदार कपिल घोरपडे यांचे प्रयत्न अन्  न्यूज मीडिया सेव्हन’च्या बातमीचा दणकेबाज ‘इम्पॅक्ट’

आंबेनळी घाटातून एसटीची वाहतूक आजपासून पूर्ववत; प्रवाशांना मोठा दिलासा! स्थानिक नागरिकांचा पाठपुरावा, तहसीलदार कपिल घोरपडे यांचे प्रयत्न अन्  न्यूज मीडिया

आंबेनळी घाटातून एसटीची वाहतूक आजपासून पूर्ववत; प्रवाशांना मोठा दिलासा! स्थानिक नागरिकांचा पाठपुरावा, तहसीलदार कपिल घोरपडे यांचे प्रयत्न अन्  न्यूज मीडिया सेव्हन’च्या बातमीचा दणकेबाज ‘इम्पॅक्ट’

Live Cricket