Home » राजकारण » वाठार किरोली जिल्हा परिषद गट, एकंबे व कन्हेरखेड पंचायत समिती गण आणि रहिमतपूर नगरपालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा येथील राधेश्याम मंगल कार्यालयात झाला.

वाठार किरोली जिल्हा परिषद गट, एकंबे व कन्हेरखेड पंचायत समिती गण आणि रहिमतपूर नगरपालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा येथील राधेश्याम मंगल कार्यालयात झाला.

भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ.भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षांत देशाचा कायापालट करण्याचे काम केलेले आहे. दूरदृष्टी असलेले खंबीर नेतृत्व देशाला मिळाले असल्यामुळे मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप हा देशाचे भविष्य आहे तर काँग्रेस पक्ष हा भूतकाळ आहे.

वाठार किरोली जिल्हा परिषद गट, एकंबे व कन्हेरखेड पंचायत समिती गण आणि रहिमतपूर नगरपालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा येथील राधेश्याम मंगल कार्यालयात झाला. या मेळाव्याला संबोधित केले या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्ष चित्रलेखा माने- कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मनोजदादा घोरपडे, शिवसेनेचे नेते वासुदेव माने, ज्येष्ठ नेते भीमराव पाटील, रामकृष्ण वेताळ, किरण बर्गे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन भिलारे, माजी उपनगराध्यक्ष शेखर माने, माजी उपनगराध्यक्ष चांदगणी आतार, डॉ. निलेश भोसले, ऍड. महेश भोसले, विक्रमसिंह कदम, संपतराव माने, संतोष कणसे, दीपक नलावडे, हर्षल गुरव, जयवंतराव माने, दीपक माने, समीर भोसले, अमर माने, सचिन बेलागडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

महिला सक्षमीकरण, तरुणांच्या हाताला रोजगार, डिफेन्स मध्ये कामगिरी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये केलेली प्रगती मोदींच्या नेतृत्वाखाली झाली आहे. काँग्रेसच्या 50 ते 55 वर्षांच्या सत्तेच्या काळामध्ये अनेकांचा उमेदीचा काळ वाया गेला. काँग्रेसला दुसरा पर्याय नव्हता, त्यामुळे देशातील जनतेला गृहीत धरण्यात आले. आता मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचा चांगला पर्याय लोकांना उपलब्ध झाल्याने गेल्या दहा वर्षांपासून भारतातील जनता भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. महायुतीच्या वतीने नरेंद्र मोदी हे देशाचे नेतृत्व करणार हे निश्चित झाले असले तरी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीकडे नेतृत्वच नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नेतृत्व नसलेली आघाडी देशाचा काय विकास करणार.

ही निवडणूक बेईमानीशी लढण्यासाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले यांचे नेतृत्व सर्वांनी हृदयात जपून त्यांना लोकसभेत पाठवावे.

– चित्रलेखा माने- कदम, भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्ष

वाठार जिल्हा परिषद गट रहिमतपूर नगरपालिका या परिसरामध्ये भाजपने कोट्यावधींचा निधी देऊन विकास कामे केली आहेत. प्रत्येकाने जर भूतनिहाय काम केलं तर मोठं लीड उदयनराजेंना आपण देऊ शकतो.

– धैर्यशील कदम, जिल्हाध्यक्ष भाजप

 

या परिसरातील तेरा गावच्या यात्रा सुरू आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने देशाचं भविष्य घडवण्यासाठी एकत्र आलेल्या महायुतीतील घटक पक्षांनी संघटितपणे काम केले तर सर्वच मतदारसंघातून उदयनराजेंना मोठे दीड मिळू शकेल. लोकांचे प्रेम उदयनराजेंच्या पाठीशी आहे.

– मनोजदादा घोरपडे, प्रचार प्रमुख कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ

जिल्ह्यामध्ये वाई सातारा कोरेगाव कराड उत्तर कराड दक्षिण या मतदारसंघांमध्ये महायुतीच्या खंबीर नेत्यांची फळी उभी आहे. आमदार मकरंद पाटील माजी आमदार मदन भोसले आमदार महेश शिंदे मनोजदादा घोरपडे अतुलबाबा भोसले यांनी मोठी ताकद लावलेली आहे.

– वासुदेव माने, शिवसेना

उदयनराजेंच्या पहिल्या निवडणुकीपासून आम्ही त्यांची जनतेविषयी असलेली तळमळ पाहतो आहोत. त्यांना जी जी कामे आणि सुचवली ती त्यांनी तत्काळ मान्य करून त्यासाठी पाठपुरावा केला. निवडणुकीत वरवर काम न करता सर्वांनी उदयनराजेंच्या विजयासाठी तन मन धन लावून काम करावे.

– संपतराव माने, माजी नगराध्यक्ष रहिमतपूर

आम्ही काँग्रेस मधून काम केले आहे. निधीची मोठी गळती या पक्षात असते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत उत्तम काम महाराष्ट्रात सुरू आहे. भाजप राष्ट्रवादी शिवसेना आरपीआय रयत शेतकरी संघटना या पक्षांनी एकत्रित मिळून काम केले तर उदयनरांना मोठे लीड मिळणार आहे.

– भीमराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य

प्रत्येक कुटुंबाच्या भविष्यासाठी भाजप सत्तेवर येणे आवश्यक

मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी प्रयत्न केलेत. काही वर्षातच भारत विकसित राष्ट्रांच्या यादीत निश्चितपणाने सामील होईल. देशातील प्रत्येक कुटुंबाच्या भविष्यासाठी भाजप सत्तेवर येणे आवश्यक आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कर्तुत्व व जनाधार असल्याने आ.श्रीमंत छ. शिवेद्रसिंहराजेंना मंत्रिपद निश्चित मिळेल – आमदार योगेश टिळेकर

कर्तुत्व व जनाधार असल्याने आ.श्रीमंत छ. शिवेद्रसिंहराजेंना मंत्रिपद निश्चित मिळेल – आमदार योगेश टिळेकर भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )-हिंदू बहुजन सन्मान

Live Cricket