हिंदवी स्कूलमध्ये स्वातंत्रदिन उत्साहात साजरा
सातारा: श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीच्या हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी सुभेदार दीपक शिंदे, संस्थचे संस्थापक अमित कुलकर्णी, हिंदवी पंचकोषाधारीत गुरुकुल प्रकल्पाच्या संचालिका रमणी कुलकर्णी, मुख्याध्यापिका मंजुषा बारटक्के, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत व ध्वजगीत संपन्न झाले.
यावेळी सुभेदार दीपक शिंदे व विद्यार्थिनी श्रिया काजरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये इयत्ता सातवीच्या व दहावीच्या विद्यार्थ्यांनीनी देशभक्तीवर नृत्य सादर केले. हिंदवी गुरुकुल प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांनी व इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर समूह गीत सादर केले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री कुलकर्णी यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधूत रमेश सावंत यांनी केले. समारोप कनका अभ्यंकर हिने केला. या कार्यक्रमांमध्ये प्लेग्रुप ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ध्वजारोहणासाठी सर्व शिक्षक, मुख्याध्यापिका, विद्यार्थी व पालक तसेच परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.
