मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येते मिनी सरस 2025 मानिनी जत्रेचे उद्घाटन
सातारा :सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर महाआवास अभियान 2024-25 जिल्हास्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ व मिनी सरस 2025 मानिनी जत्रेचे उद्घाटन मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी याप्रसंगी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद आदी उपस्थित होते.
‘उमेद’ अंतर्गत महिला बचत गटांना ताकत देण्याचे काम केंद्र व राज्य शासनाने केले आहे, राज्य शासनाने 100 दिवसांचा कार्यक्रम ठरविला आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 50 लाख महिलांना लखपती दिदी करणार आहे. महिला बचत गट आता खाद्यपदार्थांबरोबर इतर चांगल्या वस्तुंची निर्मिती करीत आहे, त्यांच्या वस्तुंसाठी विविध शहरांमधील मॉलमध्ये एक स्टॉल उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सातारा जिल्ह्यात 20 हजार महिला बचत गट आहेत. उमेदच्या माध्यमातून महिला स्वावलंबनाची एक नवी चळवळ उभी राहत आहे.
बचत गटाच्या महिला घेतलेले कर्ज नियमित फेडत असतात, या महिलांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाडून जिल्ह्यातील बचत गटांना कर्ज पुरवठा करण्यात यावा. नायगाव येथे 125 कोटी रुपये खर्च करुन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात येत आहे. येथे उमेदचे प्रशिक्षण केंद्रही उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून महिला बचत गटांना विविध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाबळेश्वर व पाचगणी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, या ठिकाणी बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजार पेठ मिळावी म्हणून मॉल उभारण्यात येतील महिला बचत गटांच्या प्रत्येक स्टॉलला भेटी देवून उत्पादित केलेल्या मालाची माहिती माहिती यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली.
यावेळी लखपती दिदींचा सत्कार, 2024-2025 अंतर्गत आवास योजेंतर्गत पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरुपात घराचा ताबा व उमेद अंतर्गत उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.या कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी तसेच महिला बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
