कोयना धरणातून १,०५० क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
कोयनानगर : कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता धरणाचे दोन वक्र दरवाजे पूर्णपणे खाली आणून सांडव्यावरून कोयना नदीपात्रात होणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे.
दरम्यान, कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १,०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार सांडव्यावरून विसर्ग पुन्हा वाढविला जाऊ शकतो.
धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, तसेच ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन कोयना सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.




