नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना ६.८३ कोटी रुपयांचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर – मंत्री मकरंद जाधव-पाटील हिंजवडीच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विशेष ‘टास्क फोर्स’; रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन व मेट्रोच्या कामांना कालबद्ध गती द्या – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार कोयना धरणातून १,०५० क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा मोराची शिकार करून मांस शिजविल्याप्रकरणी एक आरोपी ताब्यात आंबेनळी घाटातून एसटीची वाहतूक आजपासून पूर्ववत; प्रवाशांना मोठा दिलासा! स्थानिक नागरिकांचा पाठपुरावा, तहसीलदार कपिल घोरपडे यांचे प्रयत्न अन्  न्यूज मीडिया सेव्हन’च्या बातमीचा दणकेबाज ‘इम्पॅक्ट’ येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन
Home » राज्य » शेत शिवार » मोराची शिकार करून मांस शिजविल्याप्रकरणी एक आरोपी ताब्यात

मोराची शिकार करून मांस शिजविल्याप्रकरणी एक आरोपी ताब्यात

मोराची शिकार करून मांस शिजविल्याप्रकरणी एक आरोपी ताब्यात

सातारा-सातारा वन विभागाच्या कार्यक्षेत्रात मोराची शिकार करून त्याचे मांस शिजविल्याचे निदर्शनास आले असून, या प्रकरणी वन विभागाने तातडीने कारवाई करत सागर गौतम पवार, रा. वर्ये , ता. सातारा, जि. सातारा यास ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार, सदर आरोपीने मोरास सापळ्यामध्ये पकडून त्याची शिकार केल्याचे तपासादरम्यान निदर्शनास आले. त्यानंतर शिकार केलेल्या मोराचे मांस काढून ते शिजविण्यात आल्याचे घटनास्थळी आढळून आले.घटनास्थळाची पाहणी व पंचनामा केला असता मोराची पिसे, दोन पातेल्यांमध्ये शिजविलेले मांस, मोराचे दोन पाय, मोर पकडण्यासाठी वापरलेला सापळा, तीन छोटे सुरे, एक मोठा सत्तूर, विळीचा लाकडी पाट, छोटी ताटली तसेच मांस चिरण्यासाठी वापरलेली परात, वनगुन्हयात वापरलेली होंडा कंपनीची shine मोटारसायकल असा मुद्देमाल आढळून आला. सदर सर्व मुद्देमाल पंचांच्या उपस्थितीत जप्त करून पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे.

मोर (Pavo cristatus) हा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या अनुसूची-I मध्ये समाविष्ट असलेला वन्यप्राणी असून, त्याची शिकार करणे कायद्याने प्रतिबंधित आहे. सदर प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेले वन्यजीव अवशेष व मांस यांची आवश्यकतेनुसार वैद्यकीय/वैज्ञानिक तपासणी करण्यात येत असून, घटनास्थळ पंचनामा, जप्ती पंचनामा व इतर आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास वन विभागामार्फत सुरू आहे.

सदरची कारवाई मा. श्री. अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, सातारा व मा. श्री. प्रदीप रौन्धळ, सहाय्यक वनसंरक्षक, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र सातारा येथील अधिकारी व कर्मचारी तसेच वनपरिक्षेत्र फिरते पथक, सातारा येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने केली.

वन्यजीवांचे संरक्षण व अवैध शिकार रोखण्यासाठी सातारा वन विभागामार्फत नियमित गस्त, तपासणी व आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही सातत्याने करण्यात येत आहे.

— वन विभाग, सातारा

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना ६.८३ कोटी रुपयांचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर – मंत्री मकरंद जाधव-पाटील

नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना ६.८३ कोटी रुपयांचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर – मंत्री मकरंद जाधव-पाटील मुंबई,दि.३ :

आंबेनळी घाटातून एसटीची वाहतूक आजपासून पूर्ववत; प्रवाशांना मोठा दिलासा! स्थानिक नागरिकांचा पाठपुरावा, तहसीलदार कपिल घोरपडे यांचे प्रयत्न अन्  न्यूज मीडिया सेव्हन’च्या बातमीचा दणकेबाज ‘इम्पॅक्ट’

Live Cricket