धन्वंतरी पतसंस्थेच्या सोने तारण कर्ज व सभासद संपर्क कक्षाचा उदघाटन समारंभ उत्साहात संपन्न
सहकार क्षेत्रात संपूर्ण महाराष्टात आदर्शवत व सक्षम असलेल्या धन्वंतरी नागरी सह. पतसंस्थेच्या सातारा शाखेच्या सोने तारण कर्ज विभाग व सभासद संपर्क कक्षाचे उदघाटन नगर वाचनालय, तांदुळ आळी सातारा येथे अतिशय आनंदी व उत्साहाच्या वातावरणात पार पडले.
प्रथम धन्वंतरी देवतेचे पुजन व दिपप्रज्वलन प्रतिष्ठित व्यापारी श्री. अशोक गुजर, श्री. प्रविण जोशी,व्यावसायिक श्री. उल्हास भिडे व श्री. दिलीप तांबे, माउली ब्लड बँकेचे अध्यक्ष श्री. अजित कुबेर व संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले व्हा. चेअरमन डॉ. शिरीष भोईट यांचे हस्ते करण्यात आले. सोने तारण कर्ज कक्षाचे उदघाटन मा. श्री. प्रविण जोशी, श्री. दिलीप तांबे व मा. श्री. अशोक गुजर यांनी केले.
याप्रसंगी श्री. अशोक गुजर व श्री. प्रविण जोशी म्हणाले की, धन्वंतरी पतसंस्थेने सातारकरांना वेळोवेळी अर्थसहाय करून त्यांच्या प्रगतीस नेहमीच हातभार लावला आहे. ठेवीदार सभासदांप्रमाणेच कर्जदार सभासदांनाही तेवढयाच आत्मीयतेने व तत्पर सेवा देणारी धन्वंतरी पतसंस्था सातारकरांसाठी सहकार महर्षीच आहे हि भावना सर्व सातारकरांची आह असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पतसंस्थेने सभासदांसाठी केलेल्या विविध ठेव व कर्ज योजनांचा लाभ सर्व सातारकरांनी घेवून पतसंस्थेच्या व्यवसायवाढीस व पर्यायाने आपल्या प्रगतीस हातभार लावावा असे आवाहन करुन पतसंस्थेच्या पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.
सदर प्रसंगी बोलताना संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले म्हणाले, आजपर्यंतच्या सर्व संचालक व सहका-यांनी आपणां सर्वाच्या सहकार्याने धन्वंतरी पतसंस्था राज्यात प्रथम क्रमांकाची सक्षम पतसंस्था केली याचा मनस्वी आनंद होत आहे. धन्वंतरी पतसंस्थेचा आदर्श सहकारातील इतर वित्तीय संस्था घेत असून त्यांची प्रगती साधत आहेत याचा आम्हांस अभिमान वाटतो. संस्था सक्षमता व विनियोग पाहूनच सभासदांच्या आर्थिक गरजा भागवित असते. संस्था सुरुवातीपासूनच कर्जवसुली बाबत दक्ष राहील्यामुळे पतसंस्थेच्या कर्जदारांनाही नियमित हप्ते भरण्याची सवय लागली आहे आणि यामुळेच संस्थेने गेली ३४ वर्षे सरासरी वसुलीचे प्रमाणे ९१.१९% राखले आहे तसेच संस्थेचे सर्व संचालक विश्वस्ताच्या भावनेने पारदर्शक व्यवहार करत आहेत व सेवकही सभासदांना विनम्र सेवा देवून संस्थेच्या वाढीसाठीच सतत काम करीत आहेत यामुळेच संस्थेस महाराष्ट शासनाने आदर्श कामकाजाकरीता राज्यातील सर्वोच्च असा “सहकार भूषण” पुरस्कार बहाल करुन गौरविले आहे. पतसंस्था वाढीस मोलाचे सहकार्य करणा-या संचालक सभासद ठेवीदार व सेवक वर्गाचे आभार मानले. संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. शिरीष भोईटे याप्रसंगी चोलताना म्हणाले, सातारा शाखेतील लॉकर्स, हॉलची सुविधा याचा लाभ सभासदांनी घ्यावा तसेच सदर नव्याने सुरू केलेल्या नगर वाचनालयाच्या तांदुळ आळी येथील गाळयामध्ये सोमवार ते शुकवार सकाळी ११ ते सायं ५ वाजेपर्यंत सोने तारण कर्ज कक्षाचाही लाभ सर्वांनी घेवून पतसंस्थेच्या व्यवसायवाढीस हातभार लावावा. तसेच संस्था सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून धन्वंतरी फांडडेशन तर्फेही कार्य करीत आहेत.
याप्रसंगी संस्थेचे सभासद व ठेवीदार यांनी संस्थेच्या कामकाजाबदद्ल व मिळत असलेल्या ग्राहकसेवेबद्द्ल समाधान व्यक्त केले व भावी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी संचालक डॉ. कांत फडतरे, डॉ. अरविंद काळे, डॉ. शकील अत्तार, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. सुनिल कोडगुले, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. अभिजीत भोसले, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. जयदिप चव्हाण, डॉ. सौ. सारीका मस्कर, डॉ. सौ. हर्षला बाबर, डॉ. नारायण तांबे, अॅड. सुर्यकांत देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहरी डिंगणे तसेच सर्व कर्मचारी वर्ग व सभासद उपस्थित होते.