पत्रकारितेचा आदर्श चेहरा – सचिन ननावरे
सातारा -बावधन, पाचगणी, वाई सारख्या संवेदनशील आणि राजकीय दृष्ट्या चैतन्यमय गावात निर्भीडपणे पत्रकारिता करणे ही सोपी गोष्ट नाही. परंतु या आव्हानात्मक वातावरणात सत्याची बाजू ठामपणे मांडत, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा देणारे पत्रकार म्हणून सचिन ननावरे यांचे नाव आदराने घेतले जाते.
ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, शेती, शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत प्रश्नांना त्यांनी आपल्या लेखणीतून वाचा फोडली. प्रशासनापर्यंत सामान्य जनतेचा आवाज पोहोचवून विकासाची गंगा गावागावांत नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक पुण्यनगरी मधून त्यांच्या पत्रकारितेची वाटचाल सुरू असून, त्यांनी आपल्या बातम्यांतून नेहमीच वस्तुनिष्ठता आणि धैर्य जपले आहे.
ऐतिहासिक वाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकार बांधवांसाठी विविध उपक्रम राबवले. पत्रकारांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून, संघटनात्मक बांधिलकी जपत पत्रकारितेचा दर्जा उंचावण्याचे कार्य केले आहे.
त्यांची लेखणी केवळ बातम्या देत नाही, तर समाजाला दिशा देणारी ठरते. सत्य, न्याय आणि सामाजिक बांधिलकी या तत्त्वांवर उभे राहून त्यांनी पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला आहे.
अशा या ध्येयवादी, प्रामाणिक आणि जिद्दी पत्रकार मित्राला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!त्यांच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात अधिकाधिक यश लाभो, हीच सदिच्छा!
पत्रकार अली मुजावर
न्यूज हेड सातारा मीडिया 7




