निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन जनगणना २०२७ अंतर्गत दुसऱ्या टप्यातील प्रशिक्षणाचे आयोजन मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजना व मासेमारी परवाना आता पूर्णपणे ऑनलाईन दिल्लीतील भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्राच्या वैभवशाली वारशाचे दर्शन घडणार सातारा जिल्ह्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन जिल्ह्यातील ३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी अग्रीमचे पाच हजार रुपये जमा- जिल्हाधिकारी संतोष पाटील
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजना व मासेमारी परवाना आता पूर्णपणे ऑनलाईन

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजना व मासेमारी परवाना आता पूर्णपणे ऑनलाईन

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजना व मासेमारी परवाना आता पूर्णपणे ऑनलाईन

सातारा दि- १३ मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास करणे, उत्पन्न वाढविणे, रोजगार व उद्योजकतेला चालना देणे तसेच शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राज्यस्तरीय व जिल्हा वार्षिक योजनांचे एकत्रिकरण करून “मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना” राज्यात राबवली जाते. या योजनेंतर्गत एकूण २८ योजनांना मान्यता असून, त्यापैकी २४ लाभार्थीभिमुख योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मच्छिमारांना मासेमारी परवाना वितरण ही सेवाही जीपीआर अंतर्गत पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते दि. २८ ऑक्टोवर २०२६ रोजी महाडीबीटी २.० (https://mahadbt2.maharashtra.gov.in/) या पोर्टलवर विभागाच्या २४ योजनांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे.

या सुधारणांमुळे अर्ज प्रक्रिया सुलभ होणार असून, ऑफलाईन कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. विविध शासकीय डेटाबेसमधून आवश्यक माहितीची स्वयंचलित पडताळणी होणार असून, मंजूर अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच सेवांची प्रमाणपत्रे ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.तरी राज्यातील सर्व मत्स्यशेतकरी, मच्छिमार, मत्स्यव्यवसायिक व मच्छीमार संस्थांनी महाडीबीटी २.० पोर्टलवर आधार क्रमांकाच्या आधारे महाआयडी तयार करून योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत व या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन नितेश राणे, मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे यांनी केले आहे.

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सातारा कार्यालयामध्ये “मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सहाय्यता कक्ष” स्थापन करण्यात आला असून महाआयडी तयार करणे किंवा ऑनलाईन अर्ज करताना अडचणी आल्यास सहाय्यता कक्षाशी संपर्क साधावा (मो.क्रं. ८३०८३३६१४६, ९५४५४५२६१५) या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे, आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सातारा प्रदीप सुर्वे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन

निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन सातारा 13 : राज्य शासनाचे निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना केंद्र शासनाच्या

Live Cricket